ग्रामपंचायतचे कुलर चक्क सदस्यांच्या घरी
राजेश येसेकर भद्रावती/ वरोरा
वरोरा : तालुक्यातील बोडखा ग्रामपंचायत येथील कुलर एका ग्रामपंचायत सदस्य यांनी चक्क आपल्या घरी नेले असल्याने गावात जोरदार चर्चा होत आहे.
बोडखा ग्रामपंचायत ही नेहमीच कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने चर्चेत असतात आता नविनच प्रकार चर्चेत आहे. बोडखा ग्रामपंचायत मधिल सदस्यांने ग्रामपंचायतच्या मालकीचे कुलर थेट आपल्या घरी नेले आहे. असे गावातील शिवसेना विधानसभा मिडिया प्रमुख गणेश चिडे यांना या बाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ ग्रामपंचायामध्ये धाव घेतली. असता तिथे कुलर दिसले नाही. या बाबत येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता हा प्रकार उघडकीस आला.
सदर हि घटना दि. १३ मे गुरुवारला घडले. या दिवशी बुद्ध पौर्णिमा असल्याने शासकीय सुट्टी होती. त्यामुळे गणेश चिडे यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांना फोनवर माहिती दिली. २४ मे रोज शुक्रवारला गणेश चिडे यांनी गट विकास अधिकारी यांना पंचायत समिती वरोरा येथे जाऊन निवेदन दिले. व सवीस्तर विषय समजून सांगितले यांच्या निवेदनाची दखल घेऊन लवकरच कुलर संदर्भात चौकशी करण्यात येईल अशी माहिती गट विकास अधिकारी वरोरा यांनी दिली आहे.


0 टिप्पण्या