अर्पित वाहाणे चित्रा न्यूज
वर्धा :- आर्वी गांधी चौक आर्वी येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका मंजुषा ताई शिंदे यांचा कार्यक्रम संपन्न झाला व तो प्रचंड मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरला आर्वी शहरातील गांधी चौक हा शहराच्या मध्यभागी असून नेहमी गजबजलेला असतो अनेक सभा व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रम
होत असतात. ज्याचे पडसाद सर्वत्र ग्रामीण भागापर्यंत जात असतात. ज्याची नोंद अनेकांना घ्यावी लागते.
ख्यातनाम गायिका मंजुषाताई शिंदे यांच्या कार्यक्रमाला आर्वी शहरातील शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील लोकांची ही प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यातील विविध तालुक्यातून संगीत प्रेमी या या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच यवतमाळ व वेगवेगळ्या जिल्ह्यातील काही वयोवृद्ध मंडळी सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. ज्यांची व्यवस्था समितीच्या माध्यमातून आर्वी शहरातील दोन मुख्य विहारांमध्ये करण्यात आली होती. हेच या कार्यक्रमाच्या यशाचे गमक आहे.


0 टिप्पण्या