राजेश साठे यांना श्रद्धांजली अतिशय वाईट घटना
अकोला जिल्ह्यातील एमआयडीसी येथे बार्शीटाकळी पोलीस स्टेशन हद्दीतील
अर्पित वाहाणे चित्रा न्यूज वर्धा
अकोला:- दि.४ मे २०२४ ला दुपारी तीन ते चार च्या दरम्यान घडली १७ ते १८ वर्षाचा सोहम राजेश साठे नावाचा मातंग समाजाचा मुलगा कंपनीमध्ये काम करत असताना करंट लागून मृत्युमुखी पडला या घटनेमुळे समग्र अकोला जिल्ह्यात दुःखाचं वातावरण पसरलं या घटनेमुळे एमआयडीसीत सर्व कामगार भयभीत झाले आशिष इंगळे या कंपनीचा मालक आहे आलू चिप्स बनवण्याची हे कंपनी आहे याच कंपनीत हा मुलगा तीनच दिवस झाले कामाला गेला आणि ज्याला काही माहीत नाही त्या मशीनवर या मुलाला या मालकाने पाठवले जो ऑपरेटर होता तो ऑपरेटर कामावर नव्हता ऑपरेटरचा काम ज्याला काही माहीत नाही अशा मुलाला या मालकाने करायला सांगितले त्या मशीनमध्ये करंट होता असं माहीत असताना सुद्धा तीन दिवसाच्या या कामगार पोराला त्या मशीनवर कसं काय पाठवले.?. त्याला करंट लागल्यानंतर त्याच्या अंगावर कॅनभर थंडगार पाणी टाकण्यात आले, त्या पोराला कुठलीही ॲम्बुलन्स न बोलवता मालवाहक गाडी टाकण्यात आले या मालकाच्या हलगर्जीपणामुळे हा मुलगा दगावला या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या मुलाचा परिवार आज उघड्यावर आला या कुटुंबातलं मोठं डोंगर कोसळलं करता धरता मुलगा घरातून निघून गेला हा परिवार रस्त्यावर उपासमारीने तळफळून मरू नये यासाठी गरीब कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहिजेत या मागणीसाठी आम्ही बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला सर्वजण गेलो व तिथे कंपनीला आम्ही सील लावायचे सांगितले आणि मालकावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आर्थिक मदत मिळाले पाहिजेत यासाठी आम्ही बार्शी टाकली पोलीस स्टेशनला गेलो जोपर्यंत या मातंग समाजाच्या गरीब कुटुंबाला न्याय मिळत नाही आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही तुमच्या हलकर्जीपणामुळे आज घरातला कर्ताधर्ता पोरगा निघून गेला याचा जिम्मेदार फक्त आणि फक्त कंपनीचे मालक आशिष इंगळे हेच आहेत यांनी जरी या परिवाराला मदत नाही केली तर अकोला जिल्ह्यात एमआयडीसीत धिंगाणा केल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि या पोराला सम्राट अशोक सेनेकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,
,आकाश दादा शिरसाट,
बार्शीटाकळी मध्ये उपस्थित असलेले
आशु दादा शिरसाठ,
गजानन भाऊ दांडगे,


0 टिप्पण्या