Ticker

6/recent/ticker-posts

बळीराम पुर येथील घनकचरा डेपो ची आग तिनं दिवसा पासून धुमसतीच ,

विजय चौडेकर चित्रा न्युज 

नांदेड - बळीराम पुर तुप्पा परिसरात असलेल्या मनपाच्या घनकचरा डेपोला लागलेली आग गेल्या तीन दिवसांपासून धुमसतच आहे, या मोठ्या आगीमुळे निर्माण झालेल्या प्रचंड धुरा मुळें बळिराम पुर औद्योगिक वसाहत सिडको, हडको परिसरात धूर व दुर्गंधी चे साम्राज्य निर्माण झाले आहे,धुमसणार्या आगीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, म्हणून या परिसरातील हजारो नागरिक घान वासाच्या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत, नांदेड वाघाळा महानगर पालिकाचा घनकचरा संकलन डेपो हा, बळीराम पुर, तुप्पा परिसरात, आहे, या ठिकाणी नांदेड शहरासह सिडको, हडको परिसरातील कचरा संकलन करून याच परिसरात त्यावर प्रक्रिया केली जाते मोकाट जनावरे परिसरातील नागरिक ये जा करत असतात,त्याच परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्या मुक्त संचार असतो,या घनकचरा डेपो ला कोणी तरी आज्ञात व्यक्ती ने तीन दिवसांपुर्वी आग लावली औद्योगिक वसाहतीत कारखान्यात दुर्गंधीयुक्त धुर जात आहे, त्यामुळे अनेकांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे,तर याच परिसरातील, बळीराम पुर, तुप्पा, सिडको, हडको, परिसरात धूर येत असल्यामुळे श्वासाचा त्रास होत आहे,या संदर्भात मनपाच्या स्वच्छ्ता विभागाचे अधिकारी गूलाम सादिक, आणि वासिम तडवी, यांना विचारणा केली तेव्हा अग्नीशामक दलाच्या वतीने आग विझविण्याचा प्रयत्न चालू आहे, असे सांगितले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या