Ticker

6/recent/ticker-posts

मनोज नामदेव आंबीलवादे यांची अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.


सतिश लोखंडे  छत्रपती संभाजीनगर 

छत्रपती संभाजीनगर :-राहुरी शहरातील सराफ व्यापारी मनोज नामदेव आंबीलवादे यांची नुकतीच शंकर महाराज सेवा मंडळ संचलित वधू-वर सूचक केंद्र पुणे यांची अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सचिनजी देशमुख यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती माधुरी ताई उदावंत यांच्या शिफारशीनुसार तसेच व्यवस्थापक मा. बी. व्ही .शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज नामदेव आंबीलवादे यांची अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. मनोज नामदेव आंबीलवादे यांच्या निवडीबद्दल राहुरी तालुका व अहमदनगर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना व पदाधिकारी व मित्रपरिवाराने मनोज आंबीलवादे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या