Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी आत्महत्येची भयावह आकडेवारी!

रुपाली मेश्राम चित्रा न्युज 
मुंबई :-राज्यात २०२४ मधील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शेतकरी आत्महत्येची आकडेवारी चिंताजनक आहे. जानेवारी ते एप्रिल २०२४ या चार महिन्यांत राज्यात ८३८ शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वाधिक २३५ आत्महत्या जानेवारीत झाल्या आहेत. फेब्रुवारीत २०८, मार्चमध्ये २१५ आणि एप्रिलमध्ये १८० आत्महत्या झाल्याची नोंद समोर आली आहे. या चार महिन्यांत दररोज सरासरी ७ शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
अमरावती विभागात सर्वाधिक आत्महत्या

राज्यातील अमरावती विभागात सर्वाधिक ३८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, छत्रपती संभाजीनगर विभागात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नागपूर विभागात ८४,शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.कोकणात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण शून्य आहे. तर सर्वाधिक आत्महत्या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत.

या चार महिन्यांत अमरावतीमध्ये ११६, यवतमाळमध्ये १०८, वाशिममध्ये ७७, जळगावमध्ये ६२, बीडमध्ये ५९, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४४, धाराशिवमध्ये ४२, वर्धामध्ये ३९, नांदेडमध्ये ४१, बुलढाण्यात १८, धुळ्यामध्ये १६, तर अहमदनगरमध्ये १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या