Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न


संजय देशमुख चित्रा न्युज 
सोलापूर :-वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

त्यानंतर उपस्थित सर्व जनसमुदायाला लाडू वाटप करण्यात आले. तसेच, रयत शिक्षण संस्थेचे रावजी सखाराम हायस्कूल ऑफ कॉमर्स या शाळेमध्ये तीनशे विद्यार्थ्यांना वह्या ,कंपास, पेन  इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने आरक्षण हक्क परिषदेत मंजूर केलेल्या अकरा ठरावाचे सामूहिकरित्या वाचन  करण्यात आले.

या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे, जिल्हा ओबीसी समाजाचे नेते शेखर बंगाळे,  अनिरुद्ध वाघमारे, पांडुरंग खांडेकर, गौतम बनसोडे,  प्रशांत गोणेवार,रवी पोटे, संघपाल काकडे आणि व्ही. बी. भालशंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, या वेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या