Ticker

6/recent/ticker-posts

पोस्टाची नवसंजीवनी: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पोस्टात परिवर्तन

रुपाली डोंगरे चित्रा न्युज 
पुणे: काॅर्पोरेट क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर अधिक जोर दिला जातो, त्याच कृतीचा अवलंब करून एकेकाळी मरगळ आलेल्या पोस्टाने आता कात टाकलेली दिसत आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता असली तरी सर्वच स्टाफ वेळेवर कार्यालयात यावा, लेटलतिफांना चाप बसवण्यासाठी थंब सिस्टिम हजेरी पोस्टातही सुरू केली आहे.

'मी कामानिमित्त बाहेर आहे', किंवा 'इतर कामा'चे निमित्त सांगून होणारा विलंब आता टळणार आहे. सतत तीन 'लेट इन'चा थंब असल्यास हजेरीच्या जागेवर सुटी टाकावी लागणार किंवा पगार कटणार या भीतीने कर्मचाऱ्यांचीही नियमित हजेरी वेळेवर लावण्याचा प्रयत्न आहे.

मोबाइल ॲपदेखील कर्मचाऱ्यांकडे दिलेले असल्याने ऑनलाइन लोकेशनही आता कर्मचाऱ्यांचे दिसत आहे. ठराविक ठिकाणचे टपाल लेट होत असेल तर त्याला 'ट्रॅक' करणे शक्य होणार आहे. आता मोबाइल संदेशद्वारे हे कळेल. आधार कार्ड वाटप, ड्रायव्हिंग लायसन्स, आयुर्विमा पॉलिसी तसेच सरकारी कागदपत्र सातत्याने आता टपाल कार्यालयामार्फतच येत आहेत.

बदलाच्या दिशेने एक पाऊल

या नव्या व्यवस्थेमुळे पोस्टाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असे तज्ञांचे मत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमता वाढवण्याचे हे पाऊल पोस्टाच्या भविष्यातील दिशेला दिशा देणारे ठरणार आहे. 

पोस्टात झालेल्या या बदलांमुळे ग्राहकांनाही अधिक वेगाने आणि विश्वासार्ह सेवांचा अनुभव मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पोस्टाने कात टाकली आहे आणि हे परिवर्तन नक्कीच उल्लेखनीय आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या