संजय देशमुख चित्रा न्युज
कुर्ला :- वंचित बहुजन आघाडी उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यांच्या वतीने कुर्ला तालुका कार्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असता नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच, मान्यवरांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर लाडू वाटप करुन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या प्रसंगी महिला मुंबई अध्यक्षा सुनिताताई गायकवाड, जिल्हा अध्यक्ष संतोष अंबुलगे, जिल्हा उपाध्यक्ष विरेंद्र रुके, कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर, चांदीवली तालुका अध्यक्ष दत्ता निकम, विलेपार्ले माजी तालुका अध्यक्ष संतोष उघाडे, कुर्ला महिला तालुका अध्यक्ष संध्या पगारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या