Ticker

6/recent/ticker-posts

मधुकर आबा राळेभात यांनी पक्ष सोडताना केलेले आरोप बिनबुडाचे, जनता त्यांच्या आरोपाला थारा देणार नाही...आमदार रोहितदादा पवार हे कार्यकर्त्यांचा मानसन्मान ठेवून कामे मार्गी लावतात :- विजयसिंह गोलेकर...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098

जामखेड :- मा. जि.प. सदस्य मधुकर आबा राळेभात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडत असताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत कार्यसम्राट आमदार रोहितदादा पवार यांच्यावर आरोप केले होते ,परंतु आमदार रोहित दादा हे प्रत्येक कार्यकर्त्याला व नेत्यांना मानसन्मान देऊन जनतेची कामे मार्गी लावत असतात त्यांनी आजपर्यंत मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून शासनाकडून मंजूर करून आणला आहे. ही कामे प्रगती पथावर असून काही कामांना आमदार राम शिंदे यांनी सरकारच्या माध्यमातून स्थगिती आणली आहे, तसेच एमआयडीसी सारख्या मोठ्या प्रकल्पाला विरोध करून नोकरीच्या माध्यमातून हजारो लोकांच्या पोटावर पाय देण्याचे पाप आमदार शिंदे यांनी केले आहे. मधुकर आबा राळेभात यांनी आमदार रोहित दादा पवार यांच्यावर केलेले आरोप सुपारी घेतल्यासारखे बिनबुडाचे आहेत, हे सर्व जामखेड तालुक्यातील जनता ओळखून आहे असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
          यावेळी माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, माजी सभापती सूर्यकांत मोरे, मार्केट कमिटीचे उपसभापती कैलास वराट,मार्केट कमिटीचे माजी सभापती सुधीर राळेभात, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात,तालुका युवक अध्यक्ष प्रशांत राळेभात, तालुका उपाध्यक्ष हनुमंत पाटील, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष उमरभाई कुरेशी, शरद शिंदे, कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, युवक कार्याध्यक्ष रामहरी गोपाळघरे, सरपंच सागर भाऊ कोल्हे, काका कोल्हे, रमेश आजबे, राजेंद्र गोरे ,बब्बू शेख,वसीमभाई सय्यद, रावसाहेब जाधव, नितीन ससाने, ज्येष्ठ नेते वैजिनाथ पोले, इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
         पुढे बोलताना गोलेकर म्हणाले की, खऱ्या अर्थाने कर्जत, जामखेड मतदार संघाचा शेतीचा, पाण्याचा प्रश्न, महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज वाटप, शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी 14000 सायकलचे वाटप, मतदार संघात गावोगाव वाड्या वस्त्यावर नागरिकांना घरपोच आरोग्य सेवा, हजारो रुग्णांचे डोळ्याचे ऑपरेशन, हृदयाचे ऑपरेशन अशा अनेक शस्त्रक्रिया त्यांनी मोफत केल्या आहेत, त्या माध्यमातून जनतेचे आरोग्यावर खर्च होणारे कोट्यवधी रुपये आमदार पवार यांनी स्वखर्चाने वाचविले आहेत. आज पर्यंत मतदार संघासाठी 3800 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या माध्यमातून 25 वर्षाचा मतदार संघाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम त्यांनी केले आहे.
         अशा पद्धतीने मतदारसंघाचा चौफेर विकास होत असताना त्यांनी महाराष्ट्रात युवकांचे प्रश्न हातात घेतले आहेत. त्यांच्या मागे या सरकारने ईडीची चौकशी लावली, परंतु आमदार रोहितदादा पवार हे घाबरले नाहीत तर या राज्य सरकारच्या विरोधात अनेक गंभीर आरोप करून मंत्र्यांना सळो की  की पळो करून सोडले आहे. आमदार पवार यांची लोकप्रियता मतदार संघात तर आहेच परंतु महाराष्ट्रातही युवकांमध्ये त्यांची वेळ वेगळी क्रेझ निर्माण झाली आहे.भल्या भल्या नेत्यांना जनतेच्या प्रश्नासाठी भिडणारा नेता म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे, अशा प्रकारे मधुकर आबा राळेभात यांनी केलेले सर्व आरोप निराधार असून जनता त्यांच्या आरोपांना थारा देणार नाही पुढील विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पवार हे एक लाख मतांनी विजयी होतील असा विश्वास विजयसिंह गोलेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या