Ticker

6/recent/ticker-posts

मिरेगाव येथील जनता पिते शेतातील पाणी !


विहिरी, हातपंपाचे पाणी दूषि

नळ योजनेला येतो गढूळ पाणी

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
 भंडारा :-लाखनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या २ हजार ५०० लोकसंख्येच्या मिरेगावात गेल्या अनेक वर्षापासून करोडो रुपये पाण्यावर खर्च करून सुद्धा करोडो रुपये पाण्यात गेले म्हणण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी जीवन प्राधिकरण योजनेचे फार मोठे जलकुंभ असून भविष्यात कधीच ते भरलेले नाही. दुसरीकडे महापूरक पाणी पुरवठा योजनेतून ३४ लाख रुपये किमतीचे चुलबंद नदीमध्ये पाण्याची टाकी आणि मोटार पंप बसवून सुद्धा मिरेगावकरांची तहान भागली नाह.  एवढेच नव्हे तर प्रधानमंत्री घर घर नळ, घर घर नळ २२ लाख रुपये किमतीची योजना गावासाठी डोकेदुखी ठरवून ग्रामपंचायतीच्या मालकीचे दलित वस्तीचे रस्ते फोडून सुद्धा या गावाला पिण्याचे दुर्लक्ष जाणवत आहे.
                       २ हजार ५०० लोकसंख्या असलेला मिरेगावात ४ सरकारी विहिरी, १५ हात पंप, पाणीपुरवठा करणारी करोडो रुपयांची नळ योजना कार्यान्वित असून पावसाळ्यात नळाला घाणेरडा पाणी येतो. तर हातपंपाचे पाणी पिण्या योग्य नाही या ठिकाणी एक खाजगी विहीर असून संपूर्ण मिरेगाव ह्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. मात्र संपूर्ण गावाची तहान भागविण्यास ही विहीर अपुरी पडत असल्याने आणि गावातील जनतेला एक किलोमीटर अंतर जावे लागत असल्याने काही गावकरी, पुरुष, महिला शेतातील विहिरीच्या पिण्याचा पाणी म्हणून वापर करीत आहेत.
                    गावातील शासकीय योजनेतून निर्माण केलेल्या विहिरी, बोरवेल आणि नळ योजनांच्या दूषित पाण्यामुळे रोगराई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील काही जनता शुक्राचार्य विद्यालयातील विहिरीचे तर दुसरीकडे दलित मेश्राम यांच्या शेतातील विहिरीचे पाणी पीत आहेत. तालुक्यात सरपंच संघटनेचे काम बंद आंदोलन असल्याने गावातील स्वच्छता, दूषित पाणी आणि गाव नियोजन बिघडले असून पाण्यात ब्लिचिंग पावडर किंवा अनेक प्रकारची कामे रखडली आहेत. यापूर्वीसुद्धा मिरेगाव येथे दूषित पाणी पिल्याने वार्ड क्रमांक एक मधील जनतेला गॅसेस, उलट्या लागण झाली होती. आज सुद्धा ती परिस्थिती उद्भवण्याचे चिन्ह आहेत. आयुर्वेदिक दवाखाना सतत बंद अवस्थेत असून येथील आरोग्य कर्मचारी १२:०० वाजता दवाखान्यात उपस्थित असतात. प्रामुख्याने पावसाळ्यात त्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक असताना लाखनी वरून बेलतीफ कारभार सुरू आहे. सदर बाबीकडे पंचायत समिती प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता असून गावातील पिण्याच्या पाण्याचे निर्माण तपासण्यासाठी पाठवावे. मिरेगाव येथील जनतेला शुद्ध पिण्याचे पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी अशी येथील जनतेची मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या