कालिदास खोब्रागडे,चित्रा न्युज
भंडारा :- लाखांदूर पोलीस स्टेशनच्या वतीने मासळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्मित इमारतीत जादूटोणा विरोधी कायद्याच्या संदर्भात प्रसार व प्रसार अंमलबजावणी कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी(ता.७ ऑगस्ट) रोजी दुपारी ३:०० वाजता करण्यात आले. या कार्यक्रमास गावकऱ्यांसह सुबोध विद्यालय येथील विद्यार्थी व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या आदेशानुसार मासळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्मित इमारतीमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याविषयी जनजागरण कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाखांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन पवार होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश नाकतोडे, शहर शाखा कार्याध्यक्ष नितेश बोरकर, साजन बोकडे, पोलिस पाटील रामकिसन ब्राह्मणकर, रुपेश पिल्लेवान, आदित्य नखाते, आशिष शेंडे, शेखर लांजेवार, सचिन थेर, जवाहर झलके, सतीश पोलिस अंमलदार सिंगनजुडे, विलास रणदिवे, मच्छिंद्र माखळे उपस्थित होते. यावेळी विष्णुदास लोणारे यांनी महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंध व उच्चाटन कायद्याबद्दल संपूर्ण माहिती दिली.या कायद्याचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे असे आवाहन करून नारळ हातावर उभा करणे, लाल दोरा काळा करणे, लंगर सोडविणे, स्वर्गातील पाणी हातात देणे असे विविध वैज्ञानिक प्रयोग करून दाखविले व त्यामागील कार्यकारणभाव समजून सांगितला. यावेळी अध्यक्षीय भाषणातून पी.आय. सचिन पवार यांनी कायद्याविषयक मार्गदर्शन केले. अंधश्रद्धा व श्रद्धा यातील फरक समजून अंधश्रद्धेला बळी पडू नका, स्वतःच्या आणि कुटुंबाचा विकास करा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला सुबोध विद्यालय येथील विद्यार्थी आणि नागरिक शिक्षक गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या