कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुकास्तरीय विज्ञान नाट्यउत्सव स्पर्धेमध्ये राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय लाखनीच्या समूहाने प्रथम क्रमांक पटकाविला असल्याने जिल्हास्तरावर निवड झाली आहे. मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान यातील उपविषय एआय अँड सोसायटी विज्ञान नाटकावर राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयातील विद्यार्थीनी झीनत अयुब पठाण, खुशी नागपुरे, संघवी कोचे, चिन्मयी धांडे, वेदांती तितीरमारे, फाल्गुनी भुसारी, यामिनी गायधनी, भार्गवी शेंडे या सहभागी विद्यार्थिनींनी सादरीकरण केले. या स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवर शिक्षण विस्तार अधिकारी झोडे, विज्ञान शिक्षिका खंडाईत मॅडम तसेच परीक्षक म्हणून नितेश कुरी सैनिक विद्यालय, कोरे संत ज्ञानेश्वर विद्यालय सालेभाटा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय येथील कु.चव्हाण मॅडम यांनी केले. प्रास्ताविक व आभार साधन व्यक्ती भोवते मॅडम यांनी केले. शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर झोडे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विजेत्या विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. मीरा विजय बारई यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.


0 टिप्पण्या