Ticker

6/recent/ticker-posts

अल्पावधीत शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा निषेध


आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज  
भंडारा :- महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शेजारी राजकोट येथे समुद्रकिनाऱ्याजवळ नौदल दिनानिमित्त ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल विभागाने राज्याचे  आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा सुमारे ४३ फूट उंच (१५ फूट चबुतरा आणि २८ फूट उंचीचा पुतळा) उभारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. शिवरायांनी मालवणच्या समुद्रात बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला अजून अद्यावत असून भारत सरकार च्या नौदलाने सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला ही देशासाठी चिंतेची बाब आहे या घटनेचा आम आदमी पक्ष राज्यव्यापी निषेध व्यक्त करत असून ह्या घटनेने करोडो देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत. मोदी सरकार आणि शिंदे, फडणवीस यांची डबल इंजिन सरकार मध्ये भ्रष्टाचार किती प्रमाणात वाढला आहे हे यावरून दिसून येते. नुकताच गाजावाजा करून केलेल्य वास्तु मग त्या संसद भवन असो की राम मंदिर असो या सरकारकडून लोकांच्या पैशांची नुसती उधळपट्टी होत असल्याचे यावरून सिद्ध होते. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंचल साळवे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी चंचल साळवे, दिलीप निखाडे, अतुल लोणारे, सुरज मदनकर, अन्वर शेख, भूपेंद्र गणवीर, कामेश लेंडे, खुशाल वैद्य, रुपेश सोनटक्के, धम्मदीप चव्हाण, राकेश वैद्य, हरीश नखाते, अभिजीत कातोरे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या