Ticker

6/recent/ticker-posts

डास उत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम


हर्षवर्धन देशभ्रतार  चित्रा न्युज           
अमरावती :-उपजिल्हा रुग्णालय मोर्शी अंतर्गत शहरामध्ये दि 17/08/2024 रोजी कायमस्वरूपी व तात्पुरत्या डास उत्पत्ती स्थानांमध्ये हिवताप ,डेंगू ,चिकनगुनिया, हत्तीरोग इ कीटकजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी विविध ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले तसेच जपाली हनुमान मंदिर परिसरामध्ये नवीन गप्पी मासे पैदास केंद्र तयार करण्यात आले व त्यामध्ये मा भगत सर (हत्तीरोग अधिकारी)  यांचे हस्ते गप्पी मासे सोडण्यात आले. यावेळी पत्रकार संजू भाऊ गार पवार जपाली मंदिर येथील महाराज दीपक पुरोहित तसेच नागरिक रावसाहेब अढावू ,बंडूभाऊ श्रीराव, मनोहर लाडवीकर, हजर होते .जैविक उपाय योजनेअंतर्गत कीटकजन्य आजार नियंत्रणाकरिता अळीभक्षक गप्पी माशांचा वापर करण्यात येतो. साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडल्यास ते डासांच्या अळ्यांचे भक्षण करून डासांची घनता कमी करण्यास मदत करतात. गप्पी मासे सर्व प्रकारच्या डास अळ्यांचे भक्षण करतात त्यामुळे हिवताप, डेंगू, चिकनगुनिया ,हत्तीरोग यांचे निर्मूलन मध्ये मदत म्हणून ही मोहीम राबवल्या जाते. अशी माहिती व आरोग्य शिक्षण देण्यात आले.
               ही मोहीम जिल्हा हिवताप अधिकारी मा डॉ जोगी सर हत्तीरोग अधिकारी मा भगत सर व उपजिल्हा रुग्णालय मोर्शीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
             यावेळी हिवताप व हत्तीरोग कर्मचारी श्री विनय शेलुरे, प्रकाश मंगळे, प्रशांत बेहरे,सुधाकर कडू, नंदू थोरात ,ऋषिकेश दहेकर ,नागेश उडगे ,अक्षय शेवाळे, गजानन शिवणकर यांनी गप्पी मासे धडक मोहीम यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या