Ticker

6/recent/ticker-posts

कोलकत्ता येथील डॉ. मोमीता देबनाथ या महीला डॉक्टर च्या अत्याचार करूण क्रूर हत्येच्या निषेधार्थ व आरोपीला तात्काळ फाशी देण्याच्या मागाणीचे वसमत डॉक्टर असो. चे निवेदन


मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :-वसमत येथील सर्व डॉक्टर असोशिएशन च्या वतीने कोलकत्ता येथील महिला डॉक्टर वर अत्याचार करुण निर्घुन क्रूर,अमानवीय कृत्य करूण खुन करणाऱ्या आरोपीना फाशी शिक्षा व्हावी या करिता  लाक्षणीक संप करूण निषेध नोंदविण्यात आला. 
  वसमत शहरातील सर्व पैथीच्या डॉक्टर संघटनेने ओपीडी बंद करूण (तातडीची सेवा वगळता) निषेध करण्यात आला. 
डॉ. मौमिता देबनाथ..
एका ३१ वर्षीय डॉक्टर मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली आहे. कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये ३६ तास काम करून ती असेम्ब्ली हॉल मध्ये शेवटची पहाटे ३ वाजता इतरांना भेटली. 
सगळं काही नॉर्मल होतं आणि सकाळी ती मेलेली, अर्धवट कपड्यात, तुकड्यात भेटली! ना अनोळखी ठिकाणी, ना कोणत्या रस्त्यावर... हॉस्पिटल परिसरात कामावर असताना ही घटना घडलीय!
 सदरील अमानवीय घटनेची तात्काळ केंद्रीय एजन्सी द्वारा चौकशी करूण फास्ट ट्रॅक कोर्टात  निकाल लावुन आरोपीला फाशीची शिक्षा दयावी व डॉक्टर वर होणारे सततचे हल्ले थांबवीण्यासाठी केंद्रीय आरोग्य संरक्षण कायदयाला गतीमान करण्यासाठी सक्षम तज्ञ समितीची स्थापना करावी . आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणा करिता सक्षम सुरक्षा यंत्रना सर्व मुलींच्या वसतीगृहात ,महाविदयालय परिसरात अदयावत सिसीटिव्ही कॅमेरे लावावेत जेने करूण या पुढील भविष्यात मुली,महीलांच्या बाबतीत असे अमानविय घटना घडु नयेत अशा प्रकारचे निवेदन सरकारला देण्यात आले . निवेदनावर डॉ. एमआर. क्यातमवार डॅ ताभाळे डॅ काळे ,डॉ. बाळासाहेब सेलूकर , डॉ. मयुर सातपुते डॅ सचिन सातपुते डॅ मसारे डॅ अळकीने मैडम यांच्या व समस्त डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या