रवी भोंगाने साकोली
साकोली :-कोका जंगलापासून ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आतेगाव येथील ३ वर्षापासून तर १८ वर्षापर्यंतच्या बालगोपाल यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.खेळ, व्यायाम, योगा ,धावणे तसेच विविध शारीरिक कवायती द्वारे त्यांचे शारीरिक आरोग्य घडविण्यात आले. अशा युवकांचा आतेगाव येथे एकोडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या माहेश्वरी नेवारे यांनी सत्कार केला. आतेगाव येथील मुलींना गावमधील असणारे युवक संजय हटवार ,वसंता हटवार, अरविंद हटवार, देवदास सलामे, विनोद हटवार, छगन उईके, मोहपत परतेकी, दादाराम हटवार हे रोज पहाटे सकाळी सहा ते साडेसात पर्यंत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देतात. यासोबतच विविध शारीरिक व्यायाम योग तसेच रोज वयानुसार दहा ते पंधरा किलोमीटर धावणे तसेच पोलीस भरती साठी लागणारी गोळा फेक व इतरही शारीरिक कवायतीचे प्रशिक्षण मुलींसोबत मुलांनाही देतात .आतेगाव हे गाव कोका जंगलाच्या परिसरात वसलेले आहे या परिसरातील सुमारे 40 आदिवासी मुला मुलींना अनेक वर्षांपासून हा युवकांचा ग्रुप शारीरिक कष्टांसोबत इतरही व्यायाम प्रकार स्वसंरक्षणाचे धडे व योगा यांचे प्रशिक्षण देत आहे. या सर्व युवकांच्या प्रोत्साहन मिळावे ,काम करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी एकोडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या माहेश्वरी नेवारे व हेमराज नेवारे यांनी आतेगाव येथील या युवकांच्या शारीरिक स्वसंरक्षणाचे धडे देत असणाऱ्या प्रशिक्षणात त्यांचा सत्कार केला. तसेच बाळगोपाळांना देखील शारीरिक कवायत करताना लागणाऱ्या साहित्यांची ,टि शर्ट, खाऊचे पाँकेट भेट दिले. आतेगाव येथील तीन वर्षांच्या लहान मुला मुलींपासून ते अठरा वर्षांच्या युवकांपर्यंत मुलं मुली या प्रशिक्षणात शिक्षण घेत आहे यासाठी या युवकांकडून कुठलेही मानधन घेतले जात नाही हे विषेश..


0 टिप्पण्या