Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा स्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेत वसमत च्या खेळाडुंचे यश .


विभागीय स्तरावर निवड 

मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली जिल्हा ज्युडो असोशिएशन यांच्या संयुक्त विदयमाने जिल्हा स्तरीय शालेय ज्युडो  स्पर्धेचे आयोजन हु. बहीर्जी स्मारक महाविदयालय बहुउद्देशीय हॉल ,वसमत येथे करण्यात आले होते .
  या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद लक्ष्मीकांत नवघरे यांनी भूषवीले तर  उद्घाटक म्हणून 
फुटबॉल असोशिएशन चे अजगर पटेल ,मुख्याध्यापक श्री प्रविण शेळके हे लाभले तर प्रमुख उपस्थितीत जिल्हाक्रीडा अधिकारी श्री राजेश्वर मारावार, श्री आत्माराम बोथीकर, गोपाल  इसावे ,शेख मोईन , संजय सौदा ,गजानन नवघरे ,मोबीनभाई ,संतोष नांगरे , अदि मान्यवर उपस्थीत होते.
विजयी खेळाडुंना कोच गोपाल इसावे ,संबोधी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले होते. सय्यद साहील सय्यद चांदपाशा , श्री गोरखनाथ महाविदयालय चोंढी आंबा , निर्भय संतोष नांगरे , हु. बहिर्जी स्मारक विदयालय ,वसमत , विठ्ठल सावंत ,श्री सिध्देश्वर विदयालय ,वसमत , कु सौंदर्या महेश मंचेवार , पिरॅमीड इंग्लीश स्कुल ,चंदगव्हाण वसमत यांची विभागीय स्तरावर निवड झाली.
  जिल्हा ज्युडो असोशिएशन चे सचिव एम.ए.बारी यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले होते .
त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या