मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :-वसमत बस स्थानक परिसरात व बहिर्जी कॉलेज ,योगानंद कॉलेज, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, बहिर्जी महाविद्यालय, व इतर कोचिंग क्लासेस व महाविद्यालया बाहेर शाळकरी मुलींना रोड रोमिओनचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
वसमत शहर पोलीस स्टेशनच्या वतीने चिडीमार पथक शाळा परिसरात सर्व शाळकरी मुली व नागरिकांच्या मागणी प्रमाणे पोलीस पथक गस्त घालत आहे .प्रत्येक ठिकाणी पोलीस उपस्थीत राहु शकत नाहीत . *मुलींच्या मर्जी नुसार त्यांना कोणीच छेडू शकत नाही. मुलींनी या रोड रोमीयोंना प्रोत्साहीत करू नये. असे काही मुली करतात त्याचा परिणाम सर्वाना भोगावा लागतो.* मुलींनी छिचोऱ्या , टुकारांना धड़ा शिकवण्यासाठी लालमिर्ची स्प्रे चा वापर करावा. एसटी मधे सेफ्टी पिन , पेन चा वापर करूण त्यांना धडा शिकवावा जनतेनी बघ्याची भुमीका न घेता मुलींना मदत करावी बस स्टॅन्ड मध्ये टू व्हीलर घेऊन येणे डबल सीट .टिपल सीट बसणे बस स्टँडच्या चक्कर मारणे ज्या ठिकाणी मुली आहेत त्याच ठिकाणी थांबने, त्यांच्या पाठीमागे जाणे व मुली बस मध्ये बसत असता वेळेस गोंधळ करणे असे प्रकार चालू आहेत पण यामध्ये शहर पोलीस स्टेशनच्या वतीने फक्त आणि फक्त होमगार्ड दिले जात आहेत यामध्ये बस स्टॅन्ड ला दोन पोलीस कर्मचारी असून त्यांना शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेबांनी फक्त ट्राफिक जाम होऊ नये यासाठी नेमले आहेत
पण ग्रामीण भागातील व शहरी भागातील मुलींना टुकार ,हलकट रोड रोमिओ त्रास असून याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष नकरता एकदा ठोक मोहीम करूण त्यांना धडा शिकवावा अशी संस्कारी मुलींकडुन मागणी होत आहे.
यामध्ये विशेष म्हणजे एसटी कर्मचारी किंवा कंडक्टर कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांच्या अंगावर जात आहेत आणि कॉलेजचे विद्यार्थी कमी बाहेरचे विद्यार्थी जास्त मुलींना छेड छाड करूण मजा घेण्यासाठी येत आहेत आणि पुन्हा सांगत आहेत मी या कॉलेजला आहे मी त्या कॉलेजला आहे अशा टुकारांच्या पार्श्व भागावर पोलीसांची कार्यवाही झाल्याशिवाय हे वटनीवर येणार नाहीत पोलीस बांधवांनी कृपया नोंद घेऊण तातडीने अँक्शन मोड वर येऊण बेशिस्त वर्तन करणाऱ्यावर वचक बसवावा.
कोणाची ही पास कोणी ही दाखवुन वाहकास त्रास देत आहेत. अशा प्रकाराला आळा घालने आवश्यक आहे अशा गंभीर मुद्द्याकडे वसमत पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक यांना नर्म विनंती आहे. विनंती सामान्य नागरिक व पालकाकडून होत आहे


0 टिप्पण्या