संघदिप मेश्राम चित्रा न्युज
भंडारा : जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना खाजगी क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या उददेशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर ता.तुमसर जि. भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने आज आयोजित मेळाव्यात आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते सहा उमेदवारांना नियुक्ती पात्र देण्यात आले.
आज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना माहिती व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आला होता.या रोजगार मेळाव्यात जिल्हयातील व जिल्हाबाहेरील नामांकित 6 कंपन्या उपस्थित होत्या. या रोजगार मेळाव्या प्रसंगी 550 उमेदवार उपस्थित होते.
त्यापैकी एकूण 220 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये 212 उमेदवारांनी प्रत्यक्ष, 8 उमेदवारांनी गुगल फॉर्मदवारे मेळाव्यासाठी नोंदणी केली होती. रोजगार मेळाव्यात एकूण 147 उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून 20 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. तसेच स्वयंरोजगाराच्या योजनांची माहिती देण्याकरीता उपस्थित खादी ग्रामोद्योग मंडळ, दिव्यांग महामंडळ, महात्मा फुले महामंडळ यांच्याकडून 268 उमेदवारांनी स्वयंरोजगाराबाबत माहिती घेतली.
सदर मेळाव्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 34 उमेदवारांनी स्टॉल वर नोंदणी केली. सदर योजनेअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा -1, मानिंग आयटीआय तुमसर-2, सहयोग सहकारी पत संस्था मर्या-3 असे एकूण 6 उमेदवारांची निवड करुन मा. आमदार राजूभाऊ कारेमोरे यांचे हस्ते नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.
सदर रोजगार मेळाव्याच्या उदघाटनीय कार्यक्रमात राजूभाऊ कारेमोरे, आमदार मोहाडी-तुमसर विधानसभा क्षेत्र, रितेशजी वासनिक, सभापती प.स. मोहाडी, सुधाकर झळके, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा, अरुन डोगंरे, सर्वसाधारण प्राचार्य शासकीय आयटीआय तुमसर, सुहास बोंदरे, जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ भंडारा, पंकज भुते, तुमसर, यासिन छावरे तुमसर, आकाश गोदारे, तुमसर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
राजूभाऊ कारेमोरे, आमदार मोहाडी-तुमसर विधानसभा क्षेत्र, यांनी विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त युवक युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. सुधाकर झळके, सहायक आयुक्त यांनी युवक युवतींनी नोकरी प्राप्त करुन आपले कौशल्य विकसीत करुन आपले कुटूंबाचे उदरनिर्वाह करावे असे मार्गदर्शन केले. सुहास बोंदरे, जिल्हा समन्वयक अधिकारी यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची सविस्तर माहिती उपस्थित महिला उमेदवारांना दिली तसेच सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सदर महारोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा कार्यालयातील श्री.सुधाकर झळके सहायक आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली श्री.भाऊराव निंबार्ते क.कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, श्री.सोनु उके जिल्हा कौशल्य विकास समन्वयक, श्री.श.क.सय्यद वरिष्ठ लिपीक, श्रीमती.आशालता वालदे वरिष्ठ लिपीक, श्रीमती.प्रिया माकोडे वरिष्ठ लिपीक, श्री.सुहास बोंदरे जिल्हा समन्वयक, श्री.आय.जी.माटूरकर शिपाई आदींनी तसेच, श्रीमती जे.व्ही.निंबार्ते प्राचार्य यांचे अध्यक्षतेखाली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेंमधील इतर कर्मचारी तसेच आदींनी अथक परीश्रम घेतले.


0 टिप्पण्या