Ticker

6/recent/ticker-posts

विहिरीत उडी घेऊन वृद्धेची आत्महत्या

• मानेगाव/सडक येथील घटना 

• पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद 

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
 भंडारा :- आजाराला कंटाळून ९० वर्षीय वृद्ध महिलेने सरकारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार(ता.२८ ऑगस्ट) रोजी सकाळी ६:०० वाजता दरम्यान उघडकीस आली. मृतक वृद्धेचे नाव राधाबाई यशोद ढेंगे(९०) रा. मानेगाव/सडक, तालुका लाखनी असे आहे. कुटुंबियांचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस हवालदार निलेश रामटेके तपास करीत आहेत. 
                       मृतक वृद्ध महिलेची मागील ५ ते ६ दिवसापासून प्रकृती बरी नव्हती. मंगळवारी रात्रीचे सुमारास कुटुंबीयांनी राधाबाई ला औषध पाणी देऊन जेवण करून झोपी गेले. सकाळी कुटुंबीय झोपून उठल्यावर वृद्ध महिला आपले बिछान्यावर दिसून आली नाही. त्यामुळे शोधाशोध केली असता सरकारी विहिरीत तिचे प्रेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार निलेश रामटेके सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. सर्व सोपस्कार आटोपून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत तीचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुर्गेश ढेंगे यांचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी मर्ग क्रमांक ३४/२०२४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस हवालदार निलेश रामटेके तपास करीत असून वृद्ध महिलेचे मृत्यू पश्चात २ मुले, सूना, नातवंड व बराच आप्त परिवार आहे. मनमिळावू राधाबाई चे अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या