• पालांदूर पोलिसांत अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- बीए प्रथम वर्षाला प्रवेश घेण्याकरिता वडिलांकडून रोख रक्कम घेऊन निघालेली अल्पवयीन मुलगी रात्र होऊनही घरी परतली नसल्यामुळे शोधाशोध करुनही मिळून आली नसल्यामुळे कोणी तरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याचे वडिलाचे फिर्यादी वरून पालांदूर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक सोनवाने यांचे मार्गदर्शनात तपास सुरू असून वृत्त लिही पर्यंत या अल्पवयीन मुलीचा शोध लागला नव्हता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाव्दारे फेब्रुवारी, मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२वी च्या परीक्षेत सदर १७ वर्षे ११ महिने ३० दिवस झालेली अल्पवयीन मुलगी पास झाली. बीए प्रथम वर्षाला प्रवेश घेऊन येते म्हणून वडिलांकडून २ हजार ५०० रुपये घेऊन सोमवारी सकाळी १०:०० वाजता दरम्यान घरून निघून गेलो. सायंकाळ होऊनही परत न आल्याने तिचा आजूबाजूचा परिसर, मित्र व मैत्रिणी तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता मिळून आली नाही. त्यामुळे या अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची वडिलाचे फिर्यादीवरून पालांदूर पोलिसांनी अज्ञात इसमा विरुद्ध अपराध क्रमांक १३५/२०२४ कलम १३७(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस विवेक सोनवाने यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक कुंभरे तपास करीत आहेत. वृत्त लिही पर्यंत या अल्पवयीन मुलीचा शोध लागला नव्हता. सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.


0 टिप्पण्या