संजय देशमुख चित्रा न्युज
भंडारा :मोतीस्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशिय शिक्षण संस्था पेट्रोलपंप (ठाणा) ता. जि. भंडारा व्दारा संचालित नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.) ता. मोहाडी जि. भंडारा या शाळेत भारतीय स्वातंत्र्याला अमृत महोत्सवी वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दि. १३ ऑगस्ट २०२४ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत उपक्रम राबविण्यात आले.
दि. १३ ऑगस्ट २०२४ ला माध्यमिक शालांत परीक्षा २०२४ च्या परीक्षेत शाळेतून प्रथम आलेली अपुर्वा अनिल दमाहे या विद्यार्थ्यांनीच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तिरंगा प्रतिज्ञा, निपुण प्रतिज्ञा तसेच नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सायकलवर तिरंगा ध्वज लावून तिरंगा रॅली काढण्यात आली.
दि. १४ ऑगस्ट २०२४ ला उच्च माध्यमिक शालांत परीक्षा २०२४ च्या परीक्षेत शाळेतून प्रथम आलेला आनंद कुमार दमाहे या विद्यार्थ्यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सोनाली सहादेव बंधाटे, पुण्यश्वरी रूपचंद बंधाटे हे विद्यार्थी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७८ वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी दि. १५ ऑगस्ट २०२४ ला ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. बाणाभाऊ सव्वालाखे, पं. स. सदस्य मोहाडी यांच्या हस्ते थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन, पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रभातफेरी खमारी (बुज.) गावात काढण्यात आली. देशभक्तीची भावना जागृत राहण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी केली.
याप्रसंगी संस्थेचे सचिव हिरालाल गजभिये, प्राचार्य नरेंद्र गणवीर तसेच शिक्षक वृंद सुनिल नागदिवे, सूमिता गजभिये, निर्मला रंगारी, प्रा. दिनदयाल दमाहे, प्रा. अरुण कांबळे, प्रा. नाना गजभिये, शिक्षकेतर कर्मचारी अशोक गजभिये, अनिरुद्ध गजभिये व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नाना गजभिये यांनी केले.


0 टिप्पण्या