विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज,,
नांदेड :-ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र शासनाने "आयुष्यमान भारत योजना", "प्रधानमंत्री वयोश्री योजना" व राज्य शासनाने "मूख्यमंत्री वयोश्री योजना" कार्यान्वित केलेल्या आहेत. पण त्या परिपूर्ण नाहीत.त्या योजनांचा गरिब,गरजवंत, दुर्लक्षित,उपेक्षित तथा वंचित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार,विधवा माता व दिव्यांग ज्येष्ठ नागरिक समूहाला खास, सरळ आणि दिर्घकालीन कसल्याच अर्थिक फायद्याच्या नाहीत.अनेक अटी युक्त, व दुरापास्त आहेत. त्या योजना पासष्ठ वर्षाच्या पुढच्या ठराविक ज्येष्ठ नागरिक समूहा साठीच आहेत.साठ ते पासष्ठ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकां साठी प्रस्तूत योजना काहीहि अर्थिक फायद्याच्या नाहित.तसेच गरिब,गरजवंत असूनही त्यांनां त्वरित कसलाच व कुठलाच सरळ अर्थिक फायदा नाही. कुण्याही लाडल्या बहिणीने वा लाडल्या भावाने न मागता त्यांना मानधन पण अनेक वर्षा पासून हजोरोंचे मोर्चे,पदयात्रा अंदोलनें करून व मागून सुद्धा "गरिब-गरजवंत ज्येष्ठ माय बापाना" मात्र कांहीहि नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक समूहात प्रचंड नाराजी पसरलेलीं आहे.त्या मुळे येत्या विधान सभा निवडणूकित ज्येष्ठ नागरिक मतदान करण्याच्या मनस्थितीत नाहित!
.
म्हणून महाराष्ट्र शासनाने गरिब गरजवंत जन्मदात्या ज्येष्ठ माय-बापा साठी
"मुख्यमंत्री माझे ज्येष्ठ लाडले माय-बाप योजना"
कार्यान्वित करून त्वरित अंमलात आणावी.या योजने अंतर्गत गरिब गरजवंत ज्येष्ठ माय-बापांना इतर राज्या प्रमाणे प्रतिमहा फक्त 3500/-रू. विना अट त्यांच्या बँक खात्यावर सरळ जमा करावेत. म्हणजे ज्येष्ठ आम्हा नागरिकांचे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचे,स्वाभिमानाचे व आनंदाचे जाईल. अन्यथा शासनाचे लक्ष वेधण्या साठी "गरिब गरजवंत माय-बाप ज्येष्ठ नागरिकांना" शासनाचे लक्ष वेधण्या साठी "लक्षवेधी मूक मागणी महा पदयात्रा(मोर्चा) व लाक्षणिक एक दिवसीय आन्न-पाणी त्याग तथा उपोषण आंदोलन" करावे लागेल असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मा.मुख्यमंत्र्याच्या लाडल्या बहिणीं आहेत,लाडले भाऊ आहेत.मग मुख्यमंत्री महोदयांचे "आम्ही गरिब गरजवंत जन्म दाते मायबाप लाडले नाहित का?मा.मुख्यमंत्री महोदयाचे जन्म दात्या माय-बापा विना लाडल्या बहिणी व लाडले भाऊ आले कुठून?असेही त्यांनी नमूद केले आहे
तेव्हा गरिब गरजवंत ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने खास व विशेष अशी "मुख्यमंत्री माझे लाडले ज्येष्ठ माय-बाप योजना " 18/9/24 च्या आत कार्यान्वित करून अंमलात आणावी अन्यथा आम्हा ज्येष्ठ नागरिकांना "मागणी महा पदयात्रा व लाक्षणीक अन्न-पाणी त्याग तथा उपोषण आंदोलनाचा मार्गाशिवाय दुसरा पर्यायच नाही!


0 टिप्पण्या