Ticker

6/recent/ticker-posts

निलागोंदी प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :-लाखणी तालुक्यातील निलागोंदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 78 वा स्वातंत्र्यदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षा वंजारी सरपंच ग्रा.प. निलागोंदी यांच्या अध्यक्षतेखाली महेश हटवार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हर घर तिरंगा ह्या उपक्रमाच्या अंतर्गत शाळेत चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम येणाऱ्या ३ विद्यार्थ्यांना मेडल देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपसरपंच  महेश हटवार, तंमुस अध्यक्ष यशोराज हटवार, माजी सरपंच ताराचंद हटवार, सुधाकर हटवार, माजी सैनिक रमेश वंजारी, रोजगार सेवक खुशाल भुरे, ग्रामपंचायत सदस्य दिनेश वंजारी, छत्रपती हटवार, उपाध्यक्ष योगेश पडोळे, शिशुपाल वरठे, खोजराज वंजारी, सचिन बनसोड, विलास भुरे, दिलहर बनसोड, प्रियती वरठी, स्मिता बनसोड, सुषमा शेंडे, विद्या हटवार, भाग्यश्री ठाकरे, रंजू वंजारी, रुपाली वंजारी, अश्विनी शेंडे, जयश्री बंसोड,  अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मुख्याध्यापक अशोल येळमे, सहाय्यक शिक्षक दादाराम वंजारी, क्रांतीलाल पटले यांचेसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या