Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞

‌इसवी सन २०२४ -  ८ ऑगस्ट, 
‌शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत २०८०
‌भा. रा. १७ श्रावण, १९४६
युगाब्द ५१२६       
संवत्सर नाम : क्रोधी
अयन : दक्षिणायण 
ऋतू : ग्रीष्म 
मास: श्रावण
पक्ष:  शुक्ल   
तिथी: चतुर्थी (२४.३५) ~ पंचमी       
वार:   गुरूवार
नक्षत्र: उत्तरा (२३.३५) ~ हस्त      
राशी:  कन्या 

*बृहस्पती पूजन*
नाग चतुर्थी (उपवास)
वरद चतुर्थी 
**विनायक चतुर्थी*
*दुर्वा गणपती व्रत*

*भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा क्रांतिदिन*
*पितृ दिन : तैवान.* मँडेरिन भाषेत बाबा या शब्दाचा अर्थ वडील असाच होतो!
*आंतरराष्ट्रीय अनंत (Infinity) दिन*
*जागतिक मार्जार दिन*

१५०९ :सम्राट कृष्णदेवरायाचा 
राज्याभिषेक व विजयनगर साम्राज्याची स्थापना.
१६४८: स्वराज्याची पहिली लढाई – पुणे सातारा मार्गावरील खळत-बैलसरच्या लढाईत आदिलशहाचा सरदार फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी सपशेल पराभव केला.
१७८६ : जॉक बाल्मात व मिशेल-गॅब्रियेल पकार्डनी युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट ब्लांकवर सर्वप्रथम सफल चढाई केली.
१९०८: विलबर राइट यांनी पहिले उड्डाण केले.
१९४२: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा 'गांधींनी करेंगे या मरेंगे' हा संदेश दिला.
१९४९ : भुतान या राष्ट्राची स्थापना.
१९६३ : इंग्लंडच्या बकिंगहॅमशायर काउंटीत १५ दरोडेखोरांनी रेल्वेतून २६,००,००० ब्रिटीश पाउंड लुटले.
१९६७: इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी ASEAN ची स्थापना केली.
१९७४ : वॉटरगेट कुभांड - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने राजीनामा जाहीर केला.
१९८५: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.
१९९४: पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.
१९९८: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.

जन्मदिवस
१९१२: जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण 
१९१२: कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर 
१९२५: शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु पद्मश्री डॉ. वि. ग. भिडे
१९२६ : शंकर पाटील, साहित्यिक,  चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक. त्यांचे ’चोरा मी वंदिले’, ’सागराचे पाणी’, ’सवाल’, ’बाजिंदा’ हे कथासंग्रह तसेच ’सरपंच’, ’इशारा’, ’घुंगरू’, ’कुलवंती’, ’बेईमान’, ’ललाट रेषा’, ’सुन माझी सावित्री’ या कादंबर्‍या हे गाजलेले साहित्य आहे.
१९३२ : दादा कोंडके, मराठी लोकप्रिय 
अभिनेते.
१९४८: कपिल सिब्बल
१९८१ : रॉजर फेडरर, स्विस टेनिस खेळाडू.
 
मृत्यूदिन 
१९९८ : डॉ. सुमती क्षेत्रमाडे, कथा व कादंबरीकार, वैद्यकीय व्यवसाय सांभाळळून साहित्यिक अभिरुची जोपासणार्‍या लेखिका व कादंबरीकार. त्यांनी ’सीमारेषा’, ’अनुहार’, ’मेघमल्हार’, ’वृंदा’, ’युगंधरा’, ’महाश्वेता’ आदी चौदा कादंबर्‍या दोन नाटके व काही कथा लिहिल्या.
१९९९: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार
२०००: कर्नाटकाचे ज्येष्ठ राजकारणी आणि माजी मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा

*।। दास-वाणी ।।*

भिक्षेऐसें नाहीं वैराग्य । 
वैराग्यापरतें नाहीं भाग्य । 
वैराग्य नस्तां अभाग्य । 
येकदेसी  ।। 

कांही भिक्षा आहे म्हणावे । 
अल्पसंतोषी असावें । 
बहुत आणितां घ्यावें । 
मुष्टी येक  ।। 
l
।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १४/०२/१९-२० 

पोटापुरतेच अन्न रोज वेगवेगळया घरी जाऊन मागणे ही भिक्षा. ती माणसाला कमालीचा विरक्त बनवते.आसक्ती पूर्ण सुटली की विरक्ती आली समजावे.
हे महद्भाग्य फार थोडयांना लाभते.
देहाची देहपोषणाची आसक्ती असलेला सामान्य माणूस फक्त स्वार्थी पोटापुरता विचार करतो. त्याचे आचरण त्याच्या शरीरापुरतेच मर्यादित 
राहाते. हे संकुचित एकदेसी वर्तन.

नि:स्पृह महंताने मात्र ईश्वराचा जयजयकार करून काही भिक्षा आहे का ? असे विचारून दारीच थांबावे.
जे मिळेल त्यातच समाधान मानावे.
जास्त मागणी कधीच करता कामा नये. यजमानांनी जरी भरपूर धान्य आणले तरी फक्त एक मूठ स्वत:साठी घेऊन बाकी सर्व रामाचा प्रसाद म्हणून त्याच घरी ठेवावे.

भिक्षेचा विशुद्ध हेतू हा अन्नसंचय नसून, लोकसंग्रह आहे हे महंताने पक्के ध्यानी घ्यावे.

*भिक्षानिरूपण समास.*

*माहिती विशेष*
*दादा कोंडके* 
कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके (८ ऑगस्ट, १९३२ - १४ मार्च,  १९९८ ) हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वयर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी तसेच हिंदी व गुजराती भाषेतील चित्रपटांची  निर्मितीही केली. 

*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*

   🙏 💐💐💐💐💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या