पंकज पाटील चित्रा न्युज
जळगाव :-वाटिकाश्रमजवळील द्वारकाई अपार्टमेंटकडून जळगाव शहराकडे दुचाकीने बाजारात जात असलेल्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने विवाहितेसह १७ वर्षीय मुलीचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मानराज पार्कजवळ बुधवारी दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. तर सोबत असलेला तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, धडक देणारा ट्रक हा न थांबता घटनास्थळावरून फरार झाला होता. त्याला नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी नशिराबाद गावाजवळ पकडले आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.


0 टिप्पण्या