रुपाली मेश्राम चित्रा न्युज
मुंबई : एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने अनुसूचित जाती-जमातींच्या कल्याणासाठी असलेला निधी अर्थसंकल्पातून दुसरीकडे वळवला का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित
ॲड. आंबेडकर म्हटले आहे की, महिनाभरापूर्वी या सरकारने अनुसूचित जाती-जमातींच्या कल्याणकारी अर्थसंकल्पातील निधी गैर-अनुसूचित जाती-जमातींच्या खर्चासाठी वापरला होता.भाजप असो की काँग्रेस, दोघेही आपापल्या राज्य सरकारमधील अनुसूचित जाती-जमातींच्या बजेटमधून इतर योजनांसाठी निधी वळवत आहेत.
अनुसूचित जाती-जमातींच्या कल्याणासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद का केली नाही? असा सवालही ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केला.
-


0 टिप्पण्या