Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेस ने संधी दिल्यास विधानसभा निवडणूक लढणार

• सेवानिवृत्त खनिकर्म अधिकारी राजविलास गजभिये यांची माहिती 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- सेवानिवृत्त जिल्हा खनिकर्म अधिकारी राजविलास लक्ष्मण गजभिये यांनी सर्व धर्म समभाव मनात ठेऊन सामाजिक कार्य केलेले असून प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव तसेच ते उच्चशिक्षक व्यक्तिमत्त्व असून त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून अनुसूचित जातीकरिता आरक्षित असलेले भंडारा विधानसभा क्षेत्रातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे तिकीटाची मागणी केली आहे. काँग्रेस ने तिकीट दिल्यास विधानसभा निवडणुक लढविण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे. 
                     राजविलास लक्ष्मण गजभिये हे शहापूर, तालुका भंडारा येथील रहिवासी असून त्यांचे १०वी पर्यंतचे शिक्षण गावातच झाले आहे. पुढील शिक्षण औरंगाबाद(छत्रपती संभाजी नगर) येथून एमएससी, पीजीडी, बीएम पूर्ण केले. शिक्षणासोबतच सामाजिक कार्यातही ते अग्रस्थानी असत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्यांची १९९२ ला राजपत्रित अधिकारी वर्ग २ म्हणून जिल्हा खनिकर्म अधिकारी लातूर येथे नियुक्ती झाली. त्यानंतर गडचिरोली येथे स्थानांतरण झाले. गडचिरोलीत कार्यरत असताना शासकीय जागेतील दगडी खाणी शोधून रस्ते बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावल्याने मागास जिल्ह्याचे विकासाला चालना मिळण्यास मदत झाली. गडचिरोली वरून बीड त्यानंतर चंद्रपूर येथे भूविज्ञान व खनिकर्म कार्यालयात स्थानांतरण झाले असता त्यांनी कोळसा, सिमेंट चे दगड(लाईम स्टोन), चूनखडक, पायरोफीलाईट, सिलीममीनाईट, आयरनऔर इत्यादी खनिजे संशोधनात उत्तम कामगिरी केली. त्यानंतर नागपूर, औरंगाबाद, गोंदिया येथेही सेवा दिली. सेवानिवृत्त कालावधीत त्यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून सेवा देऊन निवृत्त झाले. सेवा काळात त्यांनी सामाजिक कार्यही पार पडले. तसेच प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे राजविलास गजभिये यांनी अनुसूचित जाती करिता आरक्षित असलेल्या भंडारा विधानसभा क्षेत्रातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून उमेदवारीची मागणी केली आहे. काँग्रेस ने उमेदवारी दिल्यास येणारी विधानसभा निवडणुक लढणार असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या