• जि. प. सदस्या विद्या कुंभरे यांची उपस्थिती
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील जनतेला शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे. या करिता पोहरा जिल्हा परिषद क्षेत्राच्या जि.प. सदस्या विद्या कुंभरे यांचे निधीतून आरओ मंजूर करण्यात आल्याने भूमिपूजन करण्यात आले. अशुद्ध पाण्यामुळे अनेक आजार होतात. त्यामुळे गावकऱ्यांना अकारण आरोग्यविषयक खर्च करावा लागतो. आर्थिक स्थिती कमजोर असणाऱ्या कुटुंबांना याचा फटका बसतो. ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे या करिता जिल्हा परिषद सदस्या विद्या कुंभरे यांचे फंडातून गोंडेगाव येथे आरओ लावण्यात येत आहे. त्या प्रीत्यर्थ भूमिपूजन कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि.प. सदस्या विद्या कुंभरे, सरपंच धर्मेंद्र बोरकर, उपसरपंच राजश्री गरपडे, सदस्य वर्षा बांते, नरेश गरपडे, सत्यवान कान्हेकर, निर्धन वाढीवा, तंमुस अध्यक्ष प्रकाश गरपडे यांचेसह संजय मोहतुरे, पांडुरंग बोरकर, भागवत वाढई, किशना गरपडे, लता चटूले, गणेश किन्नाके, रोहित चटूले, रवींद्र बारसागडे अंगणवाडी शिक्षिका हेमलता गरपडे, ग्रामसेवक सौरभ शेंडे, शिक्षक घनश्याम मेंढे, शिक्षिका उईके मॅडम, सेवक गरपडे, भावराव बोरकर, मिताराम वाढई इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या