तहसीलदार राम बोरगावकर यांनी निदान फोन उचलायचे तरी करावे काम ..!!
विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-2023 मधील गौरी-गणपती सणात शासनाने 100 रु.मध्ये आनंदाचा शिधा म्हणुन राशन दुकाणातुन रवा , मैदा,दाळ,तेल,साखर व पोहे दिले होते.म्हणुन गतवर्षी लाभधारकांत आनंद पसरला होता.यंदा घोषणा करुन महिना झाला तसेच गणपती आले व गेले तशा गौराई आल्या व गेल्या , तरीही आनंदाचा शिधा आज रोजी पर्यंत आला नाही.यामुळे गौरी- गणपतीचा सण महागडे किराणा वस्तू खरेदी करुन साजरा करण्यात आला.व याबाबत आज दि.17-9-24 रोजी स.11-19 वा.तहसीलदार राम बोरगावकर यांना फोन केला असता त्यांचा फोन ट्रींग-ट्रींग असा वाजला , पण त्यांनी तो उचलायचे कष्ठ घेतले नाहीत.यामुळे तहसीलदार राम बोर - गावकर यांनी फोन घेण्याचेही काम केले नसल्याने तहसीलदार साहेब आनंदाचा शिधा व लाभधारकांबद्दल किती व कशाप्रकारे काम करतात.हे यावरुन समजुन येते.
गौरी-गणपती आले तसे गेले तरीही आनंदाचा शिधा अद्यापही आलेला नाही.यामुळे लाभधारकांतुन पुरवठा खात्याच्या मनमानी बद्दल तिव्र रोष व्यक्त केला जात आहे.यंदाचा शिधा व आनंद पुढच्या वर्षी बाप्पाच्या आगमणावेळी देणार का ?
राज्यातील लाभार्थ्यांना 100 रु.मध्ये आनंदाचा शिधा गतवर्षी प्रमाणे यंदा ही गणपती-गौरी उत्सवात मिळणार . अशी घोषणा शासनाने श्रावणात केली होती.यामुळे यंदाही गणपती व गौराईचा सण,उत्सव हा आनंदा मध्ये साजरा होणार.म्हणुन लाभधारक आनंदी होते.माञ त्यांचा हा आनंद चिरकालच टिकला.! कारण,गौराई व गणपती आले आणी गेले,तरीही या भागातील राशन दुकाणात अजुनही आनंदाच्या शिध्याचा एक दाणा सुध्दा आला नाही.परिणामी लाभार्थ्यांना आनंदाच्या शिध्याविनाच गणपती व गौरी उत्सव साजरा करावा लागला . गत वर्षी पासुन केशरी,अंत्योदय व अन्य कार्डधारकांना हा शिधा दिला जात आहे.यामुळे लाभधारक आनंदी दिसत होते.परंतू यंदा गौरी-गणपती हे उत्सव संपले तरीही शिधा मिळालेला नसल्याने आनंद कसा साजरा होणार या सारखी नाराजी लाभधारकांमध्ये पसरली आहे.व याची माहिती द्यावी व घ्यावी म्हणुन उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकरांना दि.17 रोजी स. 11.19 वा.संपर्क केला.परंतू त्यांचे द्वारा कसलाच प्रतिसाद दिला नाही मिळाला.यामुळे तहसीलदार लाभार्थी व शिध्याबद्दल किती चिंतेत आहेत ! हेच त्यांच्या वर्तणावरुन दिसून आले .
गोदामातच नाही तर दुकाणात कुठून येणार आनंदाचा शिधा..!!
फ्री चे राशन देतात.तर मग आंनदाचा शिधा का देत नाही?अशी विचारणा केलो असता गोदामातच शिधा दिसत नाही,तर मग दुकाणात कसा येणार व मी कसा वाटणार.अशी माहिती स्वस्त धान्य दुकाणदार
बाळासाहेब भोसले हंडरगुळी यांनी दिली आहे.
100 रु.चा शिधा मिळाला नाही. म्हणुन लाभार्थ्यांच्या चेह-यावर आनंद दिसण्याऐवजी प्रशासना बद्दल रोष व नाराजी दिसते..


0 टिप्पण्या