सचिन बन्सोड गोंदिया
गोंदिया: गेल्या काही महिन्यांपासून जनता की पार्टी (चाबी संघटना) सदस्य नोंदणी मोहीम सुरू होताच आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन विविध पक्षांतील हजारो कार्यकर्त्यांनी जनता की पक्षात प्रवेश केला आहे. जनता की पार्टी (चाबी संघटना) चा एक भाग बनून, प्रत्येकजण लोकसेवेचा मूळ मंत्र घेऊन लोकसेवेत आहेत. सदस्यत्व मोहिमेला सुरुवात झाल्यापासून अनेक कार्यकर्ते दररोज जनता की पार्टी पक्षाचे सदस्यत्व घेत आहेत. ही संघटनाची शुरुवात सुमारे 5 वर्षांपूर्वी एकाच व्यक्तीने केली होती, परंतु आज हजारो कार्यकर्त्यांचा जनसमुदाय आणि गोंदिया विधानसभेतील जनता की पार्टी (चाबी संघटना) ही सर्वात मोठी संघटना आहे.
नुकतेच आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या जनसेवा केंद्रात अमितजी बिरिया यांच्यासह गोंदिया शहरातील सामाजिक कार्यकर्ते पंकज सावंत आणि अनिल देशमुख, वसीम शेख, दीपक नेवरे, पिंटू मारबोडे, किशन बनकर, कैलास ठाकूर, संतोष सहारे, शानू माहुले, आसू श्रीवास्तव, गणेश ठाकूर, सुनील राऊत, आकाश हेमणे, रोहन बागडे, रिंकू शेंडे, मनीष उके, सोनू पालेवार, प्रांशु नेवारे, माँटी भांडारकर, अमित मौजे, गौरी तांगसे, रोहित नेवारे, राजू सहारे, मुन्ना ठाकूर, डॉ. सचिन तांगसे, राजेश नेवारे, खेमू राऊत, चेतन जोशी आणि शुभम मारबोडे यांनी जनता की पार्टी (चाबी संघटना) मध्ये प्रवेश केला आणि जनतेची सेवा करण्याची शपथ घेतली. आमदार विनोद अग्रवाल यांनी गळ्यात गमछे घालून सर्वांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. सर्व प्रवेशिकांनी त्यांनी तयार केलेले स्केच आमदार विनोद अग्रवाल यांना स्मृतिचिन्ह म्हणून दिले त्या सर्वांचे आ.विनोद अग्रवाल यांनी मनापासून आभार व्यक्त केले.


0 टिप्पण्या