Ticker

6/recent/ticker-posts

गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाची विधानसभा सार्वत्रिक निवडणुक - 2024 च्या अनुषंगाने कारवाई.



सचिन बन्सोड गोंदिया


अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या तिघांना केले जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा आणि गोंदिया शहर पोलीस पथकाची कारवाई..

गोंदिया :- मा. पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांचे सुरक्षिततेच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राहावी याकरिता जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था भंग करणाऱ्या तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत..

       या अनुषंगाने दिनांक 16/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण व पोलीस ठाणे रावणवाडी हद्दीत अवैध *शस्त्र बाळगणारे इसम नामे-* 

 *1) रोहित प्रमोद शहारे वय 25 वर्षे राहणार पोवारीटोला* 

         यास लोखंडी दांडा असलेल्या वेल्डिंग केलेल्या चैन व्हील बनावटी शस्त्र व चाकू सह ताब्यात घेतले *तसेच*
 
 *2) निलेश तेजराम पंधरे वय 24 वर्षे राहणार मुरपार*

               यास बनावटी लोखंडी चाकूसह ताब्यात घेण्यात आले..

 त्याचप्रमाणे गोंदिया शहर पो ठाणे हद्दीत* पोलीस निरीक्षक श्री. किशोर पर्वते यांचे मार्गदर्शनात गोंदिया शहर पोलीस पथक यांनी कारवाई करत अवैध शस्त्र बाळगणारा ईसम नामे - *3 ) बादल राजेंद्र कुमार मेश्राम व 21 वर्ष राहणार गौतम नगर गोंदिया

           यास मोक्षधाम ते गौशाला जाणाऱ्या रोडवर एका लोखंडी चाकूसह ताब्यात घेतले.

      नमूद तिन्ही आरोपी विरुद्ध अवैध शस्त्र बाळगण्याबद्दल कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये कायदेशीर कारवाई करून गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.

सदरची कारवाई माननीय वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. किशोर पर्वते गोंदिया शहर आणि पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक व गोंदिया शहर चे पोलीस पथक यांनी कारवाई केलेली आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या