Ticker

6/recent/ticker-posts

तळेगाव दसासर येथे 70% मतदान झाले, मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले.

चित्रा न्युज ब्युरो
अमरावती :-तळेगाव दशासर स्थानिक ग्राम विधानसभा निवडणूक 2024 ची प्रक्रिया आज सकाळी 7.00 वाजता सुरू झाली आणि संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत चालली. या निवडणुकीत मतदारांचा मोठा सहभाग असून सायंकाळी सहा वाजेपर्यंतही मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी कायम होती. येथे एकूण 8,386 मतदारांपैकी 5,921 मतदारांनी मतदान केले, ही टक्केवारी 70.60% आहे. दरवर्षी पेक्षा ही टक्केवारी वाढलेली आहे. सकाळी मतदान
कमी झाले असलेतरी २ वाजतानंतर मतदान केंद्रावर गर्दी झाली होती मतदान शांततेत पार पडले महीलाचा पुरुषानं पेक्षा अधिक सह‌भाम होता वयोवृद्ध लोकांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला प्रत्येक निवडनुकीत येथे ही मतदान केंद्र एकाच ठिकाणी असतात परंतु या वर्षी गैरसोईचे निमित्य  उद्देशान येथेन जि.म.प्रा. मुलांचा शाळा येथे ४ केंद्र होते  व जिल्हा परिषद उर्दु शाळा येथे 4केंद्र होते त्यामुळे मतदाराची थोडीफार का होईना पण गैरसोय झालो अन्यथा काही प्रमाणात मतदान वाढले असते तळेगाव पोलिसांनी अतिशय कडक कायदा व सुव्यवस्था राखली होती तर अंगणवाडी ताई, आशा वर्कर्स व तलाठी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या