Ticker

6/recent/ticker-posts

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मोठा झटका


अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने अटक वॉरंट जारी केले

चित्रा न्युज ब्युरो
अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले आहे. हे अटक वॉरंट परदेशी कायदा अंमलबजावणी संस्थांना देखील पाठवले जाणार आहेत.

न्यूयॉर्क फेडरल कोर्टाने सौर ऊर्जा करारांसाठी कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याच्या आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याच्या आरोपाखाली गौतम अदानी आणि सागर अदानी यांना दोषी ठरवले आहे.

फेडरल कोर्टाने हे वॉरंट जारी करत असताना, संबंधित आरोपांबाबत गंभीर पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, अदानी समूह आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची विश्वासहानी करण्याचा आरोप आहे.

ही घटना अदानी समूहासाठी एक मोठा धक्का ठरू शकते, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायावर आणि समोत्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या