Ticker

6/recent/ticker-posts

मोबाईलच्या वादात वयोवृद्ध महिलेचा खून ; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा


चित्रा न्युज ब्युरो
सोलापूर :-माढा तालुक्यातील मौजे सुरली येथील फिर्यादी मुकुंद चव्हाण यांच्या शेताजवळ असलेल्या समाधान सरडे यांच्या शेतात काम करणाऱ्या आरोपी कृष्णा दादासाहेब कांबळे याने 21 जून 2018 रोजी मोबाईलच्या वादातून वयोवृद्ध महिलेचा खून केला.

घटना 21 जून 2018 रोजी दुपारी 4 वाजता घडली. फिर्यादी मुकुंद चव्हाण यांच्या आई श्रीमती द्वारकाबाई चव्हाण शेतात भुईमुगाच्या शेंगा वेचत होत्या. लाईट आल्याने त्या विहिरीवरील मोटर चालू करून उसाला पाणी देत असताना त्यावेळी ठेवलेल्या ठिकाणी तिचा मोबाईल न सापडल्यामुळे तिने आरोपी कृष्णा दादासाहेब कांबळे याला मोबाईल संदर्भात विचारले. त्यावर दोघांमध्ये वाद झाला.

द्वारकाबाईच्या पुतण्याने, योगेश चव्हाण यांनी दोघांच्या भांडणात हस्तक्षेप केला, परंतु त्या नंतर कृष्णा दादासाहेब कांबळे याने रागाच्या भरात लोखंडी खोऱ्याचा तुंबा द्वारकाबाईच्या डोक्यात मारून तिचा खून केला. त्यानंतर तिने तिचं शरीर उसामध्ये लपवले.

फिर्यादी मुकुंद चव्हाण यांनी आरोपी कृष्णा दादासाहेब कांबळे याच्याविरोधात टेंभूर्णी पोलीस ठाण्यात गु.र.नं 276/2018 भा.द.वि.क 302 अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीसांनी तपास करून आरोपीविरुद्ध मजबूत पुरावा गोळा केला आणि आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

सरकारी पक्षाने गुन्हा शाबित करण्यासाठी 12 साक्षीदार तपासले. साक्षीदारांची, डॉक्टरांची साक्ष आणि तपास दरम्यान गोळा केलेले परिस्थितीजन्य पुरावे सरकारी वकिल श्रीमती राजश्री कदम यांनी न्यायालयासमोर मांडले.

न्यायालयाने पुराव्यांचा विचार करून आरोपी कृष्णा दादासाहेब कांबळे याला भादविक 302 अन्वये दोषी ठरवले आणि त्यास जन्मठेपेची शिक्षा आणि 15,000 रुपये दंड ठोठावला.

सरकारी वकिल श्रीमती राजश्री कदम यांनी कायदेशीर बाबींचा जोरदार युक्तिवाद केला आणि तपासासाठी पोलिसांनी साक्षीदारांची आणि पुराव्यांची व्यवस्था केली.

पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी तपास दरम्यान साक्षीदारांची व पुराव्यांची वेळोवेळी व्यवस्था केली. याचप्रमाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील आणि पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी फिर्यादी व साक्षीदारांना योग्य मार्गदर्शन केले.

या प्रकरणाच्या निकालानंतर, पीडित कुटुंबाला न्याय मिळाला असून, न्यायव्यवस्था कार्यरत असल्यानं लोकांच्या विश्वासात वाढ होईल, असे सांगण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या