Ticker

6/recent/ticker-posts

भाजप चे उमेदवार प्रताप अडसड यांची बहीण सौं अर्चना रोठे या मतदार संघात प्रचार करून परतत असतांना मतदार संघातील सातेफळ फाट्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला.


चित्रा न्युज ब्युरो
अमरावती :-भाजप चे उमेदवार प्रताप अडसड यांची बहीण सौं अर्चना रोठे या मतदार संघात प्रचार करून परतत असतांना मतदार संघातील सातेफळ फाट्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात अर्चना रोठे यांचा हाताला गंभीर घाव झाले हाताची नस कटली गेली हल्लेखोरांनी मानेवर वार केले मात्र त्यांनी हातावर हे वार घेतले यावेळी त्यांच्या गाडीवरही हल्ला करण्यात आला त्याची गाडी क्रमांक एम एच २७ डी बी ५००१ या गाडीचे समोरील काच फोडण्याचाही प्रयत्न झाल्याचे समजते.
हल्ला करून हल्लेखोर अंधारात पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी यांनी सांगितले घटनेनंतर अर्चना रोठे यांना येथील डॉ सागर ढोले यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती पाठविण्यात आले, कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल करण्याकरिता चांदुर पोलीस स्टेशन एकच गर्दी झाली होती. आपला प्रचार दौरा सोडून आमदार प्रताप अडसड हे अमरावती रोथे रवाना झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या