मतदार बंधू भगिनींनो विजयाचे साक्षीदार व्हा.
रुपाली मेश्राम चित्रा न्युज
भंडारा :-भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही सर्वांगीण विकासाची निवडणूक आहे याची सर्वांना जाणीव आहे. मागील काळात
ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी औद्योगिक विकास करणे आवश्यक होते ते केले नाही त्यामुळे भंडारा पवनी विधान सभा मतदार संघात बेरोजगारी वाढली आहे,वैनगंगा नदी पात्रात तसेच गोसे धरणात येणाऱ्या नाग नदीच्या दूषित पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली नाही, भूदान योजने अंतर्गत गोसे प्रकल्प ग्रस्तांना शासकीय पडीत जमीन भूदान करण्यात आली नाही,भंडारा व पवनी शहर तसेच अड्याळ, कोंढा, कोसरा, पहेला या गावात भूमिगत विद्युत लाईन व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली नाही ,भंडारा शहरातील दसरा मैदानाचा विकास करण्यात आला नाही ,भंडारा ते मुजबी पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा चे चौपदरीकरण करण्यात आले नाही, पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले नाही,पवनी तालुक्यातील एम आय डी सी क्षेत्रात एकही नवीन उद्योग स्थापन झालेला नाही,भंडारा व पवनी तालुक्यात शासकीय कृषी व मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्यात आले नाही,भंडारा रोड रेल्वे स्टेशन ते भंडारा शहर पवनी तालुक्यापर्यंत रेल्वे सेवा सुरू करण्यात आली नाही ,ग्रामीण व शहरी भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले नाही ,सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्यात आले नाही,शेतकऱ्यांच्या शेतावर बारमाही सिंचनाची सोय करण्यात आली नाही, आवश्यक त्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यात आले नाही यामुळे भंडारा
पवनी विधान सभा क्षेत्रात विकासाचा अनुशेष असल्याचे सकृत पणे दिसून येत आहे. ज्यांनी दहा वर्षे सत्ता उपभोगली त्यांनी मात्र विकास करण्याऐवजी भंडारा पवनी विधान सभा क्षेत्र भकास करून ठेवला ही अत्यंत गंभीर बाब आहे.तरीपण ते विकासाच्या नावाखाली आपल्याकडे येतील विविध प्रकारचे प्रलोभन , आमिष देऊन आपला लाख मोलाचा मत विकत घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करतील त्यामुळे मतदार बंधू भगिनींनो अशी प्रलोभने घेऊन आपल्याकडे येणाऱ्यांना विकासा बाबत प्रतिप्रश्न करून विरोधकांची बोलती बंद करून भंडारा पवनी विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी निर्भय पणे मतदान करा.
माझ्या निष्ठावान प्रामाणिक, स्वाभिमानी नेते पदाधिकारी , कार्यकर्त्यांनो माझ्यावर विश्वास ठेवून
निवडणुकीच्या प्रचारात कशाचीही पर्वा न करता तसेच अपेक्षा न ठेवता निःस्वार्थपणे ज्या जोमाने प्रचार प्रसार करून सुजान मतदार नागरिकांमध्ये नरेंद्र पहाडे यांच्या तुतारी चिन्हाची जनजागृती करून मातांचा जोगवा मागितला आणि मतदार बांधवांनी आपल्या मागणीला सर्वप्रकाराचा समर्थन देऊन मला विजयी करण्याचा कृती संकल्प केला आहे याचा सार्थ अभिमान आहे. विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी ,
कार्यकर्ते , इष्ट मित्र मंडळी हे सर्व ताकदी निशी सोबतीला आहेत त्यामुळे माझा बूथ मजबूत बूथ असे व्यवस्थापन करून प्रत्यक्ष मतदार बंधू भगिनींच्या घरी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधून लोकशाही मजबूत करण्यासाठी शंभर टक्के मतदान झाले पाहिजे असे सर्वांनी नियोजन करावे आणि कोणत्याही प्रकारचा वाद न घालता मतदान शांततेत पार पडण्याची जबाबदारी स्वीकारावी.
भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, प्रकल्प ग्रस्त शेतकरी, शेतमजूर कामगार, भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब,शोषित पिडीत बंधू भगिनी हीच माझी शक्ती आहे .मतदार बंधू भगिनींनो ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे.ही भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची लढाई आहे . आपणा सर्वांच्या स्वाभिमानाची, अस्तित्वाची लढाई आहे.त्यामुळे माझे आदर्शवत असलेल्या सुजान मतदार बंधू भगिनींनो कोणाच्याही दबावाला, प्रलोभनाला, आमिषाला बळी न पडता माझ्या नावाच्या तुतारी चिन्हा समोरील बटण दाबून मतदान रुपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि विजयाचे साक्षीदार होऊन परिवर्तनाचा नवा इतिहास घडवावा असे आवाहन जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी केले आहे.


0 टिप्पण्या