सर्व सामान्य जनतेचा जीव धोक्यात आहे
पंकज पाटील विभागिय संपादक नाशिक विभाग
अमळनेर :- भद्रा प्रतिक माॅल जवळील चौफली बनली अपघाताचे माहेरघर. दोन महिन्यापूर्वी याठिकाणी एका तरुण मुलींचा बळी गेला. याठिकाणी प्रताप काॅले कडून येणारे वाहन लक्षात येत नाही. तसेच छञपती शिवाजी महाराज नाट्यगृहाकडून परवा भरधाव वेगाने येणारी बुलेटने समोरुन प्रताप काॅलेजला कडे जाणारे तरुण मुलांच्या बाईकला कट मारला यात ती तरुण मुले थोडक्यात वाचली.याठिकाणी भद्रा प्रतिक समोर एक गतिरोधक असले पाहिजे जेणेकरुन समोरुन
येणारे वाहनाचा वेग कमी होईल.
तरी प्रशासनाने लवकरात लवकर याविषर्यी यावर उपाय योजना करावी.सर्व सामान्य जनतेची जीव धोक्यांची घंटा लक्षात घ्यावी.अशी घटना परत होंणार नाही. नाहीतर रस्ता बनेल सर्व सामान्यासाठी यमराज.कारण हा रस्ता फार रहदारीचा व नेहमी याठिकाणी घटना घडत असतात.हि समस्या कायमची
संपली पाहिजे अशा प्रकारचे पाऊल प्रशासनाने उचले पाहिजे.नाहितर अशा प्रकारे सर्व सामान्य जनता
आपला जीव गमावेल.


0 टिप्पण्या