Ticker

6/recent/ticker-posts

तो व्हिडिओ खोटा आहे, मला बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र - मो. गौस झैन


चित्रा न्युज ब्युरो
परभणी :-परभणी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मोहम्मद गौस झैन यांच्या वतीने  परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की काल सोमवार 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माझा एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे बनावट व्हिडिओ तयार करून  सोशल मीडियावर चुकीचा संदेश प्रसारित करण्यात येत आहे. संबंधित खोटा व्हिडिओ तयार करणाऱ्या आणि व्हायरल करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर मोहम्मद गौस झैन यांची स्वाक्षरी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या