Ticker

6/recent/ticker-posts

सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा


चित्रा न्युज ब्युरो
सातारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी वंचित बहुजन आघाडीला सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने बिनशर्त जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या ओबीसी आरक्षण संदर्भातील भूमिकेचे या संघटनेने स्वागत केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी समाजाचे आरक्षण वाचावे म्हणून विधानसभा निवडणुकीत 100 आमदार निवडून आणण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे ओबीसी समाजात चैतन्याची लाट उसळली आहे. सातारा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांचा प्रचार आम्ही करू आणि ओबीसी ऐक्य महाराष्ट्राला दाखवून देऊ असेही या संघटनेने म्हटले आहे. 

विधानसभा निवडणुकीत आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे एससी, एसटी आणि ओबीसी यांचे आरक्षण संपवण्याचे षडयंत्र चालू आहे काय, असा सवाल सरकारच्या आरक्षणाच्या संदर्भातील धोरणांवरून उपस्थित होत आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीने आरक्षणाची सुरक्षा करणार असे आपल्या जाहीरनाम्यात सुद्धा नमूद केले आहे. त्यामुळे आरक्षणवादी समूह वंचित बहुजन आघाडीकडे मोठ्या आशेने पाहत आहे.
------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या