Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्याचे जनतेकडून स्वागत !

सिद्धार्थ मोकळे : वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यामुळे प्रस्थापित पक्ष उघडे पडले

चित्रा न्युज ब्युरो
मुंबई: जोशाबा समता पत्र अर्थात फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित असलेला हा जनतेचा जाहीरनामा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वतीने जाहीर करण्यात आला आहे. जाहीरनाम्यात सर्व घटकांना सामावून घेतल्याने जनता आता आमच्या पाठीशी राहील असे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा पुण्यातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मंगळवारी(दि. 5) प्रकाशित करण्यात आला. 

मोकळे म्हणाले की, जनतेमधून जाहीरनाम्याच्य संदर्भात अतिशय सकारात्मक प्रतिक्रया येत आहेत. जनतेने त्याचे स्वागत केले आहे. इथल्या सर्व शोषित, वंचित, पीडित घटकांना न्याय आणि समतेची हमी देणारे हे समतापत्र जनतेला भावलेले आहे. तशा प्रतिक्रीया जनतेमधून येत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांच्या भूलथापांना मतदार बळी पडणार नाहीत. 

आलटून पालटून सत्ता उपभोगणारे आणि जनतेचे हाल करणारे हे सर्व राजकीय पक्ष उघडे पडले आहेत. त्यामुळे जनता आता वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वास मोकळे यांनी व्यक्त केला.
----


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या