Ticker

6/recent/ticker-posts

आई संसाराचा कणा तर बाप कुटुंबाचा पाया आहे

जिल्हा परिषद सदस्या विद्या कुंभरे यांचे प्रतिपादन

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- समाजात आईला जो मान सन्मान, प्रेम मिळतो तो सन्मान क्वचितच बापाच्या वाट्याला येतो. बाप नेहमीच दुर्लक्षित असतो. कुटुंब आई भोवती फिरत असते आई कुटुंबाचा कणा तर बाप कटुंबाचा पाया असतो. असे मत जिल्हा परिषद सदस्य विद्या कुंभरे यांनी मांडले त्या कनेरी येथे मंडई महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
                   कनेरी(दगडी) संतांची नगरी म्हणून ओळखली जाते. झिगुजी महाराज पासून तर ह. भ. प. माधवराव बोन्द्रे अशी संतांची परंपरा आहे. या संतांच्या भूमीत विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नुकतेच मंडई महोत्सवाचे आयोजन केले होते. दुपारी दंडार महोत्सव तर रात्रीला "अश्रू बापाचे" या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. उदघाट्न पोहरा जिल्हा परिषद सदस्या विद्या कुंभरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी तलाठी योगराज डामरे, तर रंगपूजक म्हणून ओबीसी सेवा संघांचे तालुका अध्यक्ष प्रा. उमेश सिंगनजुडे, माजी सभापती खुशाल गिदमारे, सरपंचा लता शेंडे, मचारणा चे सरपंच अचला फटे, कर निबंधक अधिकारी अंजली बारसागडे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्रीकांत नागलवाडे, तुळशीराम झलके, सहकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष नरहरी नागलवाडे, नरेंद्र झलके, डॉ. सुधीर झलके व इतर मान्यवर विचारपिठावर उपस्थित होते. या भुतलावावर देव आहे की नाही माहित नाही. आई वडील हीच खरी देवाचे रूप आहेत. आई देवी तर बाप हा देवता आहे. आई-वडिलांच्या पायाशी जो असतो त्याला दुसऱ्याच्या पायी जाण्याची पाळीच येत नाही असे मत प्रा.उमेश सिंगनजुडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सरपंचा लता शेंडे, अचला फटे, खुशाल गिदमारे व नरेंद्र झलके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सचिन गोमाशे, प्रास्ताविक योगराज नागलवाडे तर आभार तुळशीदास बांते यांनी मानले. मंडई महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी महावीर मेश्राम, प्यारेलाल झलके, प्रदीप राघोर्ते, निलेश हलमारे, कृष्णकमाल झलके, धीरज मोहतुरे, कोमल गोमासे यांनी विशेष सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या