चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :-लाखनी येथील पीएमश्री जिल्हा परिषद गांधी विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे "शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान" या विषयावर आयोजन करण्यात आले होते. त्यात प्राथमिक इयत्ता ६ ते ८ गटात ६०, माध्यमिक विद्यार्थी इयत्ता ९ ते १२ गटात ३६, आदिवासी विद्यार्थी गटात २, प्राथमिक शिक्षक गटात ४, माध्यमिक शिक्षक गटात १ प्रयोगशाळा सहाय्यक गटात १ असे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. परीक्षकाकडून सर्व प्रतिकृतीचे मूल्यांकन करून गटनिहाय क्रमांक जाहीर करण्यात आले. सर्व विजेत्यांना तहसीलदार धनंजय देशमुख यांचेहस्ते बक्षीस देण्यात आले. त्यात प्राथमिक विद्यार्थी गट इयत्ता ६ ते ८ प्रथम अस्मी नुतेश पुरी युनिव्हर्सल इंग्लिश मिडीयम स्कुल लाखनी, द्वितीय प्रतीक तेजराम पटले ज्ञानेश्वर विद्यालय सालेभाटा, लकी सोपान दोनोडे जिल्हा परिषद हायस्कूल पोहरा, माध्यमिक विद्यार्थी गट इयत्ता ९ ते १२ प्रथम तुणव राजू कंकटवार रावजी फटे विद्यालय खराशी, द्वितीय अथर्व नेमिचंद गिर्हेपूंजे उज्वल विद्यालय लाखोरी, तृतीय मिथील मु. जगनाळे पीएमश्री जिल्हा परिषद गांधी विद्यालय लाखनी, प्राथमिक शिक्षक गट प्रथम कु. आर. वाय. राघोर्ते विषय शिक्षिका जि. प. उच्च प्राथमिक शाळा मिरेगाव, माध्यमिक शिक्षक गट प्रथम नुतेश पुरी सहाय्यक शिक्षक स्व.एन.पी.डब्लू. सैनिकी विद्यालय केसलवाडा/वाघ, प्रयोगशाळा सहाय्यक गट प्रथम शशीकांत एन. शेंडे पीएमश्री जिल्हा परिषद गांधी विद्यालय लाखनी, आदिवासी विद्यार्थी गट प्राथमिक प्रथम सुशांत अभिमन वरकडे जि. प. उच्च प्राथमिक शाळा चान्ना, माध्यमिक प्रथम गौरव गोपाल कुलसुंगे स्व. एनपीडब्लु सैनिकी विद्यालय केसलवाडा/वाघ इत्यादी विद्यार्थी व शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले असल्याचे विषयतज्ञ नरेश नवखरे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.


0 टिप्पण्या