Ticker

6/recent/ticker-posts

मनुवाद संपत नाही, तोपर्यंतआंबेडकरवादी जनता लढणार !

सुजात आंबेडकर : भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन

चित्रा न्युज ब्युरो
पुणे : ज्या ठिकाणी आपल्या 500 शुरवीरांनी पेशवाई मातीत गाडली अशा ऐतिहासिक भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभाजवळ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी शपथ घेतली. जोपर्यंत इथला मनुवाद संपत नाही, तोपर्यंत आमची लढाई कायम असेल. इथला प्रत्येक आंबेडकरवादी तोपर्यंत लढत राहील असे सुजात आंबेडकर म्हणाले.

भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे स्टेशन येथील समारकापासून ते भीमा कोरेगाव विजय स्तंभ अशा भव्य बाईक रॅलीचे आयोजन पुणे शहर, वंचित बहुजन आघाडी यांनी युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात केले होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव येथील शहीद 500 शूरवीर सैनिकांना अभिवादन केले. 

पुणे स्टेशन ते भीमा कोरेगाव बाईक रॅलीत हजारो भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय भीम, जय भीम या घोषणांनी तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक सोनोने, अमित भुईगळ, पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, वंचित बहुजन आघाडी ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य पुणे जिल्हा निरीक्षक-ऋषिकेश नांगरे पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल गवळी, अफरोज मुल्ला, महिला आघाडी शहराध्यक्ष अनिताताई चव्हाण, शहर महासचिव सारिका फडतरे, ॲड. रेखा चौरे, युवा आघाडी शहराध्यक्ष सागर आल्हाट,  शहर महासचिव शुभम चव्हाण, माथाडी शहराध्यक्ष विशाल कसबे, सम्यक विद्यार्थी आंदोलन शहराध्यक्ष चैतन्य इंगळे, महासचिव जान्हवी शेलार, शहर महासचिव विश्वास गदादे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या