चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या डावाने बँकेचे चॅनल गेट व प्रवेश द्वराचे कुलूप फोडून आत प्रवेश करून बँकेत चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी येथील दि.भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को.ऑपरेटिव्ह बँकेत 5 डिसेंबर रोजी घडली होती. या घटनेत लाखांदूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात आरोपितांविरोधात गुन्हा दखल करून तपास सुरू केला होता. त्यानुसार, 23 डिसेंबर ला घटनेतील आरोपींचा छडा लावित 3 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गोलू शेखर लारोकर, वय 10 वर्षे रा. खडीकपुरा पारडी नागपूर,. पूर्वेश दिलीप खवसे, वय 19 वर्षे रा. बडचीचोली पांढूर्णा मध्या प्रदेश, सार्थक मनोहर नवरे वय 22 वर्षे रा.काटोल यशोधानगर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिस सूत्रानुसार, लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी येथील दीं.भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को.ऑपरेटिव्ह बँक भंडारा येथे मध्यरात्रीच्या सुमारास सूना मोका बघून काही अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या बेतातून बँकेच्या चॅनल गेट चे तसेच मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप फोडून आतमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्या अज्ञात चोरट्यानी बँकेतील लॉकर फोडण्याच्या प्रयत्न केला. मात्र, लॉकर फोडण्यात त्यांना यश न आल्याने त्या चोरट्यांनी तिजोरी तसेच ठेवून आतमधील सीसी टीव्ही चे सिस्टम लंपास केले होते. विशेष म्हणजे त्या चोरट्यांनी बँकेचे टाळे फोडण्याआधी समोरील विजेच्या मीटरचे तार आणि समोरील cctv कॅमेरा चे तार कापून बंद केले होते.
बँकेचे गार्ड 5 डिसेंबर रोजी पहाटे 6 वाजताच्या सुमारास बँकेकडे आल्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली होती. त्यावरून लाखांदूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार सचिन पवार, पोलिस उपनिरीक्षक गोमालडू, संतोष चव्हाण, आणि चमू घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनेची पाहणी केली होती. आणि लाखांदूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपितांविरिधत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
या घटनेत चोरीचा डाव फसल्यानंतर त्या चोरट्यांनी नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलिस स्टेशन हद्दीत चोरी करून फरार झाले होते. मात्र, चोरी करून फरार झाल्याच्या घटनेतील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने उमरेड पोलिसांनी आरोपींना पकडले. दरम्यान, आरोपींना विचारपूस केली असता लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी येथील बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याची त्यांनी कबुली दिली. त्यामुळे, लाखांदूर चे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह गोमलाडू, पोलीस हवालदार संतोष चव्हाण, पोलिस अंमलदार जयेश जवंजारकर, निलेश चव्हाण, विकास रणदिवे, आदींनी आरोपींना न्यायालयातून विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले.


0 टिप्पण्या