चित्रा न्युज प्रतिनिधी
धुळे :-साक्री तालुक्यातील इच्छापूर गावातील तिघांनी फोटोग्राफर पंकज पाटील याच्यावर हल्ला करून मारहाण केली. हल्ला करणाऱ्या तिघांवर कारवाई करावी अशी मागणी फोटोग्राफर विकास मंचने केली. यासंदर्भात अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना निवेदन दिले. प्रवीण रमेश थोरात, वामन गोरख थोरात आणि आकाश शिवा थोरात यांनी अल्बमचे काम करण्यासाठी गेलेल्या पंकज पाटील याला फोटो अल्बम देऊन टाकण्याची दमदाटी केली. पंकज पाटील याने पेमेंट न मिळाल्याने फोटो अल्बम देण्यास नकार दिल्यावर या तिघांनी मिळून शिवीगाळ करून पंकज पाटील या फोटोग्राफरला मारहाण केली.


0 टिप्पण्या