चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर ;- सत्तूर घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या आरोपीला शांतीनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. गौरव उर्फ मन्नत रतन वर्मा २२, रा. झेंडा चौक, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मन्नत गुरुवारी २७ मार्चला रात्री ८:३० वाजता झेंडा चौकात हातात शस्त्र घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती गस्त घालत असलेल्या शांतीनगर पोलिसांना मिळाली. पोलिस तेथे पोहोचले असता, आरोपी मन्नत पोलिसांना पाहून पळून जात होता. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ २०० रुपये किंमतीचा लोखंडी सत्तूर आढळला.


0 टिप्पण्या