Ticker

6/recent/ticker-posts

परभणीतून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता


चित्रा न्युज प्रतिनिधी 
परभणी: – शहरातील लक्ष्मीनगर, पारदेश्वर मंदिर जवळील रहिवासी 19 वर्षीय सावली उर्फ दिव्यानी मुकुंद शिंदे ही तरुणी दि. 11 मे 2025 पासून बेपत्ता झाली आहे. तिच्या वडिलांनी दि. 12 मे रोजी नानलपेठ, परभणी  पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यानी शिंदे हिचे वडील मुकुंद बालासाहेब शिंदे (मो.9970819821) हे शेती व्यवसाय करतात. दि. 11 मे रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ते शेतीच्या कामासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी घरात त्यांची पत्नी जयश्री, आई कुसुमबाई, लहान मुलगी समीक्षा आणि दिव्यानी उपस्थित होत्या.
दरम्यान, दिव्यानी हि कोणालाही काहीही न सांगता अचानक घराच्या दाराला कडी लावून निघून गेली. काही वेळाने जयश्री शिंदे यांनी मुकुंद शिंदे यांना फोन करून घडलेली घटना कळवली. तात्काळ घरी परतलेल्या मुकुंद शिंदे यांनी परिसरात, नातेवाईकांकडे, तसेच दिव्यानीच्या मित्र-मैत्रिणींमध्ये तिचा शोध घेतला. मात्र ती अद्याप कुठेही सापडलेली नाही.
दिव्यानीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे – व्यवसाय – शिक्षण, उंची अंदाजे 5 फूट, रंग गोरा, मध्यम बांधा, केस बॉब कट व काळ्या रंगाचे, अंगात निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट व पांढऱ्या रंगाचा चौकडा शर्ट, पायात गुलाबी रंगाचा बूट, डावा डोळा अर्धवट झाकलेला, तिला मराठी, हिंदी भाषा बोलाता येते.  दिव्यानी कोणाला आढळल्यास नानलपेठ पोलीस स्टेशन संपर्क क्रमांक 02452-220450, पोलीस निरीक्षक श्री. कामठेवाड, मो. 8668583366, तपासीक अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल एस.एस. मुरकुटे, मो. 8766881682 या क्रमांकावर साधावा, असे आवाहन असे तपासीक अंमलदार, पोलीस स्टेशन नानलपेठ, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या