कामगारांच्या प्रश्नावर कामगार आयुक्तांना निवेदन
महाराष्ट्र राज्य जय कामगार चळवळीचा आंदोलनाचा ईशारा
अहमदनगर :-कामगार कायद्यांच्या बदलांमुळे कामगारांचे स्वातंत्र्य हिरावत चालले आहे गरिब परिस्थितीमुळे कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना कंपन्या स्वतःचे गुलाम असल्यासारखे वागवत आहे गरजवंत कर्जबाजारी कामगार मजबुरीतुन अधिकाऱ्यांच्या छळाला बळी पडत आहे कामगारांच्या मानवाधिकारावर गदा निर्माण झाली असुन अन्याया विरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना गुंडाचा वापर करून कंपन्याचे अधिकारी इंग्रजांप्रमाणे वागत आहेत कामगारांना निर्भय सुरक्षित करण्यासाठी शिरूरमध्ये १ मे कामगार दिनाच्या दिवशी "जय कामगार" चळवळीचा शुभारंभ झाली असुन शिरूरसह पुणे जिल्ह्यातील कामगारांच्या प्रश्नावर पुणे कामगार आयुक्त कार्यालयाकडे महाराष्ट्र राज्य कामगार चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी प्रत्यक्ष कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कंपन्यांचे तातडीने ऑडीट घेण्याची मागणी केली असून प्रमोशनसाठी अधिकारी कामगारांच्या शारीरीक मानसिक आरोग्याशी खेळत असुन अनेक कामगारांना टार्गेट करून मानसिक छळ कंपन्यांमध्ये होत आहे अनेक अग्रीमेंटमध्ये गुंडांच्या माध्यमातून कामगारांवर हात उचलत केले जात आहे नोकरीवरून काढण्याचे भितीमुळे कामगार भ्र शब्द काढायला घाबरत आहेत कंत्राटी कामगारांना कामाचा योग्य मोबदला मिळावा,कंत्राटी कामगारांचे पगार कंपन्यांनी कामगारांच्या खात्यावर जमा करावेत,शारीरिक व्याधीमुळे काम करण्यात समस्या येणाऱ्या १५ वर्षांपुढील जुन्या कामगारांना तातडीने योग्य तो मोबदला देवून स्वेच्छानिवृत्ती देण्यात यावी,डिप्लोमा इंजिनियर कामगारांना प्रमोशन देताना होणारा भेदभाव थांबवाना, ओव्हरटाईम न देणाऱ्या ठेकेदारांवर कार्यवाही करावी, कंत्राटी कामगारांना हक्काची रजा त्यांना देण्यात यावी, कामगारांना त्यांच्या अधिकार हक्काची माहिती कंपन्यांमध्ये देण्यात यावी कंपन्यांमध्ये घडणाऱ्या अपघांताना गाभिर्याने घ्यावे तिव्र स्वरूपाच्या अपघातांमध्ये कामगारांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वादाची जबाबदारी कंपन्यांनी घ्यावी आदी विविध मागण्या पुणे कामगार आयुक्त कार्यालयाकडे बाळासाहेब प्रेमल वसंत वाघ, अपर कामगार आयुक्त,पुणे यांना जय कामगार चळवळीने प्रणेते शरद पवळे यांनी दिले असुन कार्यवाही न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा ईशार आयुक्त कार्यालयाला देण्यात आला.
0 टिप्पण्या